महाराष्ट्र

'मराठ्यांना 16 टक्के आरक्षणाचे गाजर'

सकाळवृत्तसेवा

सिंदखेडराजा : मराठ्यांना 16 टक्के आरक्षण हा केवळ निवडणूक गाजरासारखा विषय आहे, यातून काहीही साध्या होणार नाही. तसेच, सवर्णांच्या 10 टक्के आरक्षणाबाबतही संशय आहे. काही काळ सवर्णांचे आरक्षण टिकेलही; पण मराठा आरक्षण निवडणुकीनंतर राहणार नाही, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे केले.

सिंदखेडराजा येथे मराठा सेवा संघाच्या वतीने आज आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी खासदार संभाजी राजे छत्रपती, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, खासदार प्रताप जाधव, अभिनेते अमोल कोल्हे, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार रेखाताई खेडेकर, "स्वाभिमानी'चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

खेडेकर पुढे म्हणाले, की आज जिजाऊ जन्मोत्सवामुळे सिंदखेडराजाला नवी ऊर्जा मिळते आहे. ते एक ज्ञान केंद्र बनले आहे. सुमारे आठ कोटी रुपयांची उलाढाल या ठिकाणी होते. समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव द्या. याशिवाय गुजरातमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याला ज्या मोदींनी 30 वर्षांपूर्वी विरोध केला होता, त्यांनीच निवडणुकीसाठी छत्रपतींचे नाव वापरले.

मुंबई येथील समुद्रातील शिवस्मारक हेदेखील या सरकारच्या अवाक्‍याबाहेरचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वसामान्य रयतेचे राजे आहेत. त्यामुळे त्यांचा पुतळा सिंहासनावर बसलेला असावा, असे ते म्हणाले. संघ व हिंदुत्व फसले आहे, असेही ते म्हणाले.

संसदेच्या आवारात जिजाऊंचा पुतळा उभा राहिला पाहिजे व पुढील वर्षी शिवजयंती दिल्लीत साजरी झाली पाहिजे, असे आवाहन संभाजी राजे यांनी या वेळी बोलताना केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते अभिनेते अमोल कोल्हे, आंतरराष्ट्रीय बॅटमिंटनपटू प्राजक्ता सावंत व सर्जिकल स्ट्राईकचे प्रणेते राजेंद्र निंबोरकर यांचा मराठा विश्‍वभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

सर्जिकल स्ट्राइकमागे शिवरायांची प्रेरणा 
देशात झालेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या मागे छत्रपती शिवरायांचीच प्रेरणा होती, असे सांगून त्यांचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीला दाखविण्यासाठी छत्रपती शिवरायांचे स्मारक मुंबईतील राजभवनाच्या जागेवर व्हावे व ते सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात असावे, अशी अपेक्षा पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT