महाराष्ट्र

माझी छकुली परत येणार नाही हो...

सकाळवृत्तसेवा

कोपर्डी - ‘‘माझी कोवळी छकुली त्या नराधमांनी आमच्यातून हिसकावली. हाल-हाल करून तिच्या देहाची विटंबना केली. ती गेली; पण पेटती पणती मागे ठेवून गेली. कोर्टाने तुम्हाला आता फाशी दिली. तुम्ही नरकात जाल..; पण माझी छकुली आता परत येणार नाही ना हो...’’ अशी आर्त साद देत ‘निर्भया’च्या आजीने अश्रूंना मोकळी वाट करून दिली.

घरी एकट्याच असलेल्या आजी ‘आरोपींना फाशीच होईल’ असे सकाळपासून पत्रकार व बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांना सांगत होत्या. हातातील कामे करतानाच अस्वस्थ होऊन त्या बोलत होत्या. ‘तुम्ही नगरला निकाल ऐकण्यासाठी का नाही गेलात’, या प्रश्‍नांवर काही क्षण शांत होऊन त्या म्हणाल्या, ‘आमच्यासाठी येथे थांबलेल्या पोलिस दादांना कोण जेवायला देणार? बाकीचे गेले, म्हणून मी घरी थांबले..!’

‘सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली’ हा निरोप आजींना दिला. त्यावर आकाशाकडे पाहत त्या माउलीने हात जोडले. देवाचे उपकार मानले. ‘अंड्याची भाजी करायची आहे. आजी मला मसाला दे, असे म्हणत अवखळ छकुली सायकलवरून गेली. माझ्या छकुलीवर झडप घालून त्या नराधमांनी तिच्या शरीराचे लचके तोडले’ अशी संतप्त भावना व्यक्त करतानाच ती माउली अक्षरश: ओक्‍साबोक्‍शी रडू लागली. ‘मला काय माहीत, पुढे काय वाढून ठेवले आहे. थोडे जरी वाटले असते, तर मी तिला सोडायला गेले असते. तिचा काय हो दोष..? तिला तर काहीच समजत नव्हते. खेळायचे वय होते तिचे.. नराधमांनी तिच्या शरीराची चाळण केली. माझ्या छकुलीला हिसकावले. आता तुमचे सोने झाले काय..?’’ असे संतापाने म्हणत डोळ्यांतील पाणी साडीच्या पदराने पुसत त्या नि:शब्द झाल्या.

स्मृतिस्थळाजवळ  सुन्न वातावरण
‘निर्भया’वर अत्याचार झाला, त्या परिसरातील शांतताच सगळे कथन करीत होती. तिच्या स्मृतींचे जतन करण्यासाठी उभारलेल्या स्मृतिस्थळाच्या चौथऱ्यावर हवेचा गारवा जाणवत होता. मात्र, वातावरण सुन्न करणारे होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT