Nirjaj, Khotaradan and Unmatched Corrupt Government: Raj Thackeray
Nirjaj, Khotaradan and Unmatched Corrupt Government: Raj Thackeray 
महाराष्ट्र

निर्लज्ज, खोटारडं आणि बेमालूम भ्रष्टाचारी सरकार : राज ठाकरे

सकाळवृत्तसेवा

मुंंबई : राज्यात एक लाख 25 हजार विहिरी बांधणं असो, जलयुक्त शिवार योजना असो, की 'हागणदारीमुक्त महाराष्ट्र' ही घोषणा, प्रत्येक बाबतीत निर्लज्ज, खोटारडं आणि बेमालूम भ्रष्टाचारी असं राज्य सरकार मी यापूर्वी कधीही पाहिलेलं नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.

शेकडो कोटी रूपयांच्या विकासनिधीच्या नवनव्या घोषणा करायच्या, त्याहून जास्त निधी जाहिरातींवर खर्च करायचा आणि शेवटी त्या योजनेच्या लाभार्थीची फसवी आकडेवारी लोकांसमोर मांडायची, ही या सरकारच्या कामाची पढती आहे, असे राज ठाकरे म्हणाले. 

पुढे ते म्हणाले, सध्या मी पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. मेळघाटातील ज्या चिलाटी आणि रुईपठार या दोन गावात मी गेलो होतो, त्या गावात जायला आजही साधा चांगला रस्ता नाही. सत्ताधारी भाजप पक्षाचा इथला आमदार गेल्या चार वर्षात या गावांमधे साधा फिरकलेलाही नाही. गावात वीज नाही, बँक आणि मोबाइल रेंज नाही, दिवसेंदिवस अशी गावं बाहेरच्या जगापासून तुटलेली असतात. कुठल्या 'कॅशलेस इकॉनॉमी'च्या आणि 'डिजिटल इंडिया'च्या बाता आणि थापा मारतंय हे भाजप सरकार?

या सरकारमधील दुसऱ्या पक्षाबद्दल तर बोलायलाच नको. स्वतः सरकारमध्ये असताना "आम्ही सरकारकडून काम करवून घ्यायला सरकारमध्ये आहोत", असं म्हणणाऱ्या शिवसेनेचा ढोंगीपणाही आजवर अनेकदा उघड झाला आहे.

एकीकडे, सरकार काम करत नाही, असं शिवसेना म्हणते आणि तरीही सरकारमध्येच राहते आणि दुसरीकडे, शिवसेना अशी दुतोंडी वागत असतानाही भाजप त्यांना सोबत ठेवते, यावरून हे सरकार किती दुटप्पी आहे, हेच सिद्ध होतं. लोकांनी मोठ्या विश्वासाने त्यांना सत्ता दिली होती, पण या सरकारने मात्र लोकांचा विश्वासघातच केला, असेही राज ठाकरे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT