महाराष्ट्र

Loksabha 2019 : राज्यात ‘आप’ही रिंगणात

सकाळवृत्तसेवा

पुणे - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आता राज्यात आम आदमी पार्टी (आप) देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. या संदर्भातील प्रस्ताव पक्षाच्या राज्य समितीने दिल्लीतील राष्ट्रीय समितीकडे पाठविला आहे. सध्या कार्यकर्ते अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. राष्ट्रीय समितीने सकारात्मक निर्णय घेतल्यास पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिकमधून ‘आप’चे उमेदवार निवडणूक लढविण्याची शक्‍यता आहे. परंतु राज्यातून किती उमेदवार रिंगणात उतरणार हे गुलदस्तात आहे.

केवळ शहरी भागावर लक्ष केंद्रित करण्याचे ‘आप’ने ठरविले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतून उमेदवार निवडणुकीत उतरविले होते. मात्र या निवडणुकीत केवळ शहरी भागावर लक्ष केंद्रित करण्याचे पक्षाने ठरविले आहे. गेल्या निवडणुकीचा अनुभव पाहता, या निवडणुकीत कोणत्या भागातून संभाव्य उमेदवार उभे करणे सोईस्कर ठरेल, याचा अभ्यास करून पक्षाच्या राज्य निवड समितीने संबंधित प्रस्ताव राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडी पाहणाऱ्या समितीकडे पाठविला आहे. राष्ट्रीय पातळीवर पक्षातर्फे दिल्ली, पंजाब आणि हरियाना येथील निवडणुकीला प्राधान्य दिले जात आहे. येथील निवडणुकीची रणनीती, उमेदवारीबाबत निर्णय जाहीर होईल. त्यानंतर महाराष्ट्रातील उमेदवारीबाबत घोषणा होणार आहे. त्यामुळे आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. मात्र हा निर्णय आठवड्याच्या अखेरीस होण्याची शक्‍यता असल्याचे ‘आप’चे राज्य प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी सांगितले. 

या पूर्वी २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने पुणे जिल्ह्यातील चारही मतदारसंघातून उमेदवार जाहीर केले होते. यात पुण्यातून सुभाष वारे, मावळमधून मारुती भापकर, बारामतीतून सुरेश खोपडे आणि शिरूरमधून सोपानराव निकम यांना  उमेदवारी दिली होती. ते निवडून आले नसले, तरी मत मिळविण्याच्या यादीत ते तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर राहिले आहेत, हेही दुर्लक्षित करून चालणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT