Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis 
महाराष्ट्र

Loksabha 2019 : 'आगे आगे देखो होता है क्‍या' - मुख्यमंत्री

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता भाजपमधील इनकमिंग आणखी वाढणार असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज "आगे आगे देखो होता है क्‍या' असे सूचक वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही आता कमळ हाती घेण्याची घोषणा केल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

भाजप मित्रपक्षांच्या पदरात लोकसभेची जागा पडणार नसून बारामतीतही कमळ चिन्हांवरच निवडणूक लढवली जाणार असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज मीडिया रूमचे उदघाटन झाले या वेळी ते बोलत होते. भाजपमध्ये कुणाचीही नाराजी नाही, गेल्या निवडणुकीत युतीची कामगिरी चमकदार होती. या निवडणुकीत त्यापेक्षा मोठी लाट असून विक्रमी जागा निवडून आणणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला. त्याचवेळी मित्र पक्षांना लोकसभेत जागा मिळणार नाही, तर आगामी विधानसभेत त्यांना सामावून घेण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले. शिवसेना - भाजप युतीत जागांची अदलाबदल देखील होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी प्रकाशित होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: नाशिकात ५ तर दिंडोरीत ६ उमेदवारी अर्ज बाद

SCROLL FOR NEXT