voting
voting 
महाराष्ट्र

Loksabha 2019 : मावळ, शिरूरमध्ये उद्या मतदान

सकाळवृत्तसेवा

पुणे - मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता. २९) सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना रविवारी मतदान साहित्यांचे वाटप होणार आहे. मतदारांसाठी मदत केंद्रे सुरू केली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी शनिवारी दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघात २५०४ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी ४७ केंद्रे संवेदनशील आहेत. शिरूरमध्ये २२९६ केंद्रापैकी ३१ संवेदनशील आहेत. संवेदनशील केंद्रांसह प्रत्येकी १२४ आणि २३० वेब कास्टिंगद्वारे जोडली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून तेथील परिस्थितीवर ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे. 

मतदार यादीतून काही दुबार आणि मृत मतदारांची नावे वगळली आहेत. परंतु ही संख्या जास्त नाही. तसेच, काही नवीन मतदान केंद्रे असतील. त्यामुळे मतदारांना ऐनवेळी अडचण येऊ नये, त्यासाठी मदत केंद्रे असतील. मतदारांसाठी केंद्रांवर सुविधा दिल्या आहेत. मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन राम यांनी केले. 

निवडणुकीदरम्यान, मावळ मतदारसंघात ३३ हजार २२९ लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. त्याची किंमत सुमारे ३२ लाख ५७ हजार रुपये आहे. शिरूर मतदारसंघात २५ हजार ८३ लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला. त्याची किमत सुमारे ५१ लाख रुपये आहे. तसेच, मावळात ११ लाख ७९ हजारांची रोकड तर, शिरूरमध्ये २४ लाख ७५ हजारांची रोकड जप्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT