Jayant Patil  esakal
महाराष्ट्र बातम्या

जनतेने आमदारांना पायऱ्यांवर नव्हे, तर... सत्ताधारी आंदोलकांना जयंत पाटलांनी सुनावलं

विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील मारामारी महाराष्ट्रासाठी शोभनीय नाही. अशा शब्दात जयंत पाटलांनी सर्वांना सुनावलं.

धनश्री ओतारी

जनतेने आमदारांना पायऱ्यांवर नव्हे, तर विधिमंडळात बसण्यासाठी निवडून दिलयं अशा शब्दात राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी सत्ताधारी आंदोलकांना सुनावलं.(Maharashtra Assembly Monsoon Session Jayant Patil demand ban agitation and shooting on the steps of the vidhan bhavan )

सत्ताधाऱ्यांनी विधानसभेच्या अखेरच्या दिवशीही विरोधकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. युवराजांची कायमच दिशा चुकते असे म्हणत सत्ताधाऱ्यांनी आदित्या ठाकरेंनाही डिवचले. यासर्वावरुन जयंत पाटील यांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. तर काल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी अभूतपूर्व गोंधळ घातला, एकमेंकाना धक्काबुक्की केली. यावरुनही जयंत पाटलांनी संताप व्यक्त केला.

विधानभवनाच्या नियमाप्रमाणे, आपण कसं वागयचं, कुठे बसायचं, पायावर पाय ठेवून इथे बसण्याचा अधिकार नाही, प्रेक्षक गॅलरीत बसलेले पत्रकार, लोकांना कसं बसायचं याचे नियम आहेत.

विधानभवनाबाहेर पायऱ्यांवर बसण्य़ाचे काम थांबलं पाहिजे, पायऱ्यांवर कोणताही सदस्य बसला नाही पाहिजे. जनतेने आमदारांना पायऱ्यांवर बसण्यासाठी नाही तर विधिमंडळात बसण्यासाठी निवडून दिले आहे. विधिमंडळाकडे देश आदर्श म्हणून बघतो त्यामुळे विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील मारामारी महाराष्ट्रासाठी शोभनीय नाही. अशा शब्दात जयंत पाटलांनी सर्वांना सुनावलं.

चॅनेलला देखील शूटिंग करण्यास बंदी घातली पाहिजे. जे पायऱ्यांवर असतात त्यांचे शूटिंग काढू नये असा आपण निर्णय घेतला, आपण आधी पायऱ्यांवर कॅमेरे होते ते बाहेर नेले. येथे शूटिंगवर बंदी घातल्यास कोणाला तिथे आंदोलन करण्याची इच्छाच राहणार नाहीत अशी शब्दात जयंत पाटलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना टाकला मोठा डाव! , आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत दिसणार 'हा' पक्ष!

मुलगी झाली हो...! कियारा आणि सिद्धार्थ झाले आई-बाबा, मल्होत्रा कुटुंबात चिमुकल्या पाहुणीचं आगमन!

heart-stopping footage : Video काळजाचा थरकाप उडवणारा! 'तो' ट्रॅकवर निपचित राहिला पडून अन् वरून धावती रेल्वे

आता ट्रेनच्या जनरल कोचमध्ये फक्त १५० प्रवाशांना तिकिटे मिळणार! रेल्वे मंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tesla Car Booking Offer: बंपर ऑफर...! आता फक्त २२ हजारांत बुक करता येणार 'टेस्ला'ची अलिशान कार, मात्र...

SCROLL FOR NEXT