Uddhav Thackarey 
महाराष्ट्र बातम्या

राज्य पाच टप्प्यात अनलॉक होणार; ठाकरे सरकारची मोठी घोषणा

राज्यातील जिल्ह्यांची पाच लेव्हलमध्ये करण्यात आलीय वर्गवारी

विराज भागवत

मुंबई: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने लॉकडाउन (Maharashtra Lockdown) लागू केलं होतं. या लॉकडाउनमधून आता हळूहळू राज्यातील जनता बाहेर (Unlock) पडत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रातील कोरोना रूग्णवाढीचा दर (Positivity Rate) आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता (Beds Occupancy) यांच्या आधारावर राज्यातील जिल्ह्यांची पाच विभागात वर्गवारी (5 Level Districts System) करण्यात आली असल्याचे राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सांगितले. पहिल्या लेव्हलपासून ते पाचव्या लेव्हलपर्यंत लॉकडाउनचे नियम हळूहळू कडक होत जातील असं सांगण्यात आलं आहे. म्हणजेच, पहिल्या लेव्हलमधील जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन पूर्णपणे उठवण्यात (Restrictions Lifted) आला आहे तर पाचव्या लेव्हलमध्ये कडक लॉकडाउन कायम असणार आहे. (Maharashtra Lockdown Important announcement about Unlock State Restrictions 5 levels Districts system introduced)

कसे असतील निर्बंध? कोणाला मिळणार सूट?

"राज्यातील रूग्णवाढीचा दर आणि बेड्सची उपलब्धता यांचा अभ्यास करून आजच्या बैठकीत लॉकडाउनबद्दलचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थितीचे अवलोकन करून काही जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये अंशत: शिथिलता देण्याचा विचार अंतिम करण्यात आला आहे. 5 टक्के पॉझिटिव्हीटी रेट आणि 25 टक्केच्या आतीस ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी यांच्या आधारावर लेव्हल 1 मधील जिल्हे ठरवण्यात आले आहेत. या जिल्ह्यांमध्ये रेस्टरन्ट्स, मॉल्स, सायकलिंग, वॉकिंग ट्रक, कार्यालये, क्रीडा संकुले, सिनेमागृहे, मालिका आणि चित्रपटांचे शूटिंग, सांस्कृतिक कार्यक्रम (200 जणांच्या मर्यादेसह), सामाजिक कार्यक्रम, या सर्व गोष्टींना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. जशी-जशी जिल्ह्याची लेव्हल बदलत जाईल, त्यानुसार काही गोष्टींवर बंधने येतील", असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

पहिल्या लेव्हलमधील जिल्ह्यांना संचारबंदीपासून मुक्ती

"संचारबंदीचे नियम पहिल्या लेव्हलच्या जिल्ह्यांना लागू राहणार नाही. पण दुसऱ्या लेव्हलपासून हे नियम काही अंशी पाळणे गरजेचे आहे. ब्युटी सेंटर्स, सलूनला पहिल्या लेव्हलला परवानगी असेल. दुसऱ्या लेव्हलला 50 टक्के क्षमतेने हा सुविधा पुरवता येतील. बस सुविधा, अंतर जिल्हा प्रवास याचीदेखील लेव्हलनुसार नियमावली स्पष्ट करण्यात आली आहे. पहिल्या लेव्हलमधील सर्व वाहतूक व्यवस्था सुरू राहतील. दुसऱ्या लेव्हलमधील मुंबई लोकलची सुविध सध्या तरी बंद असेल. पण आठवड्याभरात ही सेवा सुरू होऊ शकते. दुसऱ्या आणि तिसऱ्या लेव्हलमध्ये असलेल्या जिल्ह्यांना बससेवा मिळेल पण RED ZONE मधील जिल्ह्यांना मात्र कडक लॉकडाउन पाळावाच लागेल", असेही त्यांनी स्पष्ट केले.

आंतरराज्य RT-PCR ची गरज नाही; शाळांबद्दलही विचार सुरू

"आंतरराज्य प्रवासासाठी आता RTPCR टेस्टची गरज लागणार नाही. सर्व प्रकारच्या नियमांची अमलबजावणी उद्यापासूनच करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दर शुक्रवारी जिल्ह्यांच्या स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. ठाणे जिल्हा लेव्हल 1 मध्ये असल्याने सर्वसामान्यांना बस, ट्रेन सेवा सुरू असणार आहे. मुंबई जर लेव्हल 1 ला आली तर लोकल सुरू करणार. महत्त्वाची बाब म्हणजे, नव्या वर्षातील शाळा सुरू कधी सुरू होणार याची चर्चा आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय पुढील बैठकीत घेतला जाणार आहे", अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

पाच टप्प्यातील जिल्ह्यांची यादी

लेव्हल1 - औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम

लेव्हल 2 - अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार

लेव्हल 3 - बीड, अकोला, कोल्हाृपूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग

लेव्हल 4 - पुणे, रायगड

लेव्हल 5 - उर्वरित सर्व जिल्हे RED ZONE मध्ये कायम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT