Uddhav Thackeray
Uddhav Thackeray  Sakal
महाराष्ट्र

हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

राज्याच्या विधानसभेत एकीकडे शिंदे फडणवीस सरकार विश्वासदर्शक ठराव १६४ बहुमताने जिंकत असतानाच दुसरीकडे मात्र शिवसेना पक्षप्रमुख हेदेखील पक्ष बांधणीसाठी सक्रीय झाल्याचे दिसले.

मुंबई - राज्याच्या विधानसभेत एकीकडे शिंदे फडणवीस सरकार विश्वासदर्शक ठराव १६४ बहुमताने जिंकत असतानाच दुसरीकडे मात्र शिवसेना पक्षप्रमुख हेदेखील पक्ष बांधणीसाठी सक्रीय झाल्याचे दिसले. शिवसेना पुनर्उभारणीसाठी उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांची बैठक आज शिवसेना भवन येथे घेतली. यावेळी सत्ताधाऱ्यांनाही त्यांनी आव्हान देत सवाल केला की, हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ, आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल, तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल. भाजपचा हा शिवसेना संपवण्याचा डाव असल्याचेही ते म्हणाले. 

शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना आवाहन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लढायचे असेल तर सोबत रहा. भाजपचा शिवसेना संपवण्याचा हा डाव आहे. जिल्हा प्रमुखांना सोबत राहण्यासाठी हाक देतानाच त्यांनी हात उंचावत शिवसेनेसोबत असल्याचेही सांकेतिकरीत्या दर्शवण्याचे आवाहन केले. त्यावर सर्व जिल्हा प्रमुखांनी शिवसेनेसोबत असल्याची ग्वाही हात उंचावत दिली.

घटना तज्ज्ञांना विनंती आहे आपण घटनातज्ञ आहात असे उद्धव ठाकरे म्हणाले. सध्या जे सुरु आहे ते घटनेला धरून सुरु आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे, त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा असेही आवाहन त्यांनी घटना तज्ज्ञांना केले. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरु आहे, त्याबाबत सर्वाना सत्य बोलू द्या. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान असल्याचेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT