Maharashtra Monsoon Update 2022
Maharashtra Monsoon Update 2022 
महाराष्ट्र

पुढील ४८ तासांत पाऊस, महाराष्ट्रात 2 दिवसांत मान्सून धडकण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

पुढील ४८ तासांत महाराष्ट्रासह देशातील काही प्रदेशात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

मागील काही दिवसांपासून राज्यात मान्सूनचा लपंडाव सुरु आहे. दरम्यान, यंदा वेळेआधी मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र गोव्याच्या वेशीवर मान्सून रखडला असल्याने हवामान खात्याला तोंडघशी पडावे लागले. दरम्यान, कोकणात कालपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरला असल्याची चर्चा आहे. यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला असून पावसाचा जोर वाढत रहावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. (Maharashtra Monsoon Update 2022)

आता पुन्हा एकदा पुढील ४८ तासांत महाराष्ट्रासह देशातील काही प्रदेशात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यामध्ये मध्य अरबी समुद्रासह, गोवा, दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडूचा काही भाग आणि दक्षिण आंध्र प्रदेशातील काही भागांत मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील 2 दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

मागील काही दिवसांपासून गोव्याच्या वेशीवर रखडलेल्या मान्सूनने आता कोकणात एंट्री केली आहे. काल दिवसभर कोकणात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी हलक्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. सुमारे एक तासाहून अधिक काळ हलका पाऊस झाला आहे. रत्नागिरीसह संगमेश्‍वर, लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली आहे.

दरम्यान, पावसाअभावी कोकणातील भात पिकाच्या पेरण्या रखडल्या होत्या. त्यांना दिलासा मिळाला असून पेरण्यांच्या कामाला वेग आला आहे. तसेच पावसाचा अंदाज घेऊन ज्या शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या आहेत त्यांना या पावसाने दिलासा मिळाला आहे. तर दूसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांतील पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT