महाराष्ट्र

संरक्षण उत्पादनात बीएईची गुंतवणूक - मुख्यमंत्री

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - संरक्षणविषयक उत्पादनांची महाराष्ट्रात निर्मिती करण्यास बीएई सिस्टीम्स ही ब्रिटिश कंपनी उत्सुक असून, त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या प्रशिक्षणासाठी ट्रेनर हॉकची निर्मिती करण्यात येणार आहे. बीएई सिस्टीम्सचे अध्यक्ष रॉजर कार यांच्यासोबत दावोस येथे झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 48 व्या वार्षिक परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचे शिष्टमंडळ जागतिक पातळीवरील विविध प्रतिष्ठित आर्थिक-औद्योगिक संस्थांशी संवाद साधत आहे. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये बीएई सिस्टीम्सचे अध्यक्ष कार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. बीएई सिस्टीम्स ही संरक्षण, सुरक्षा आणि एरोस्पेस क्षेत्रातील बहुराष्ट्रीय ब्रिटिश कंपनी आहे. या कंपनीने महाराष्ट्रात संरक्षण उत्पादनाला चालना देण्यासाठी गुंतवणूक करण्यास उत्सुकता दाखविली आहे. त्यासाठी राज्य सरकार त्यांना आवश्‍यक त्या सर्व सुविधा देणार आहे. पुढच्या महिन्यात मुंबई येथे होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या जागतिक उद्योग परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रणसुद्धा कंपनीने स्वीकारले असून, भारतीय कंपन्यांसोबत संरक्षण उत्पादन क्षेत्रात अधिक काम करण्याची तयारीदेखील त्यांनी दर्शविली आहे. जागतिक बॅंकेच्या फूड ऍग्रिकल्चर ग्लोबल प्रॅक्‍टिस विभागाचे वरिष्ठ संचालक जॉर्जेन व्योगेल यांनीही दावोस येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी जागतिक बॅंकेच्या मदतीने राज्य सरकार राबविणार असलेल्या हवामानपूरक शेतीचा प्रकल्प अर्थात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेबाबत चर्चा झाली. या प्रकल्पासाठीच्या बहुतेक बाबींची पूर्तता केंद्र सरकारकडे करण्यात आली असल्याने जागतिक बॅंक लवकरच त्यावर निर्णय घेणार आहे, अशी माहिती व्योगेल यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT