Maharashtra Political Crisis hearing will be on november1 in SC over Shiv Sena Shinde groups power struggle  esakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर! दिवाळीनंतर होणार सुनावणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात शिंदे गट आणि शिवसेना यांच्याच खरी शिवसेना कोणती? यावरून कोर्टात वाद सुरू आहे. दरम्यान काल झालेल्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या कामकाजाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. हा एक विषय निकाली निघाल्यानंतर आता याचिकेतील इतर मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टास सुरू असलेली सुनावणी लांबणीवर पडली आहे. यामध्ये अपात्रतेची याचिका आणि इतरही अनेक मुद्द्यावरील सुनावणी आता थेट दिवाळीनंतर होणार आहे.

शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाचा निकाल हा एक महिना लांबणीवर गेला आहे. आतापर्यंत या प्रकरणात घटनापीठाच्या स्थापनेनंतर अवघे दोन दिवस सुनावणी झाली आहे, त्यामुळे आता पुढील सुनावणी कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान पुढची तारीख एक नोव्हेंबर अशी देण्यात आली आहे. सध्या सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या चिन्हाबाबत निर्णय घेण्याची मुभा मिळाली आहे. मात्र सुप्रीम कोर्टातील सुनावणी एक महिना लांबणीवर पडल्याने शिवसेनेच्या चिंतेत काही प्रमाणात भर पडणार आहे. अद्यापही कोर्टासमोर सत्तासंघर्षाबाबत अनेक मुद्दे आहेत, ज्यावर निर्णय येणे बाकी आहे.

काल काय झालं?

काल दिवसभर चाललेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात ढवळाढवळ करणार नसल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या कामकाजाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. यामुळं शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकणार आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा झटका मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT