Police-Voting
Police-Voting 
महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : पोलिसांचे शत-प्रतिशत मतदान

ब्रिजमोहन पाटील

विधानसभा 2019 : पुणे - बंदोबस्तामुळे पोलिसांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन पुणे पोलिस आयुक्तालयाने कर्मचारी व अधिकाऱ्यांचे शत-प्रतिशत मतदान करून घेण्यासाठी तीन महिन्यांपासून खटाटोप सुरू केला आहे. यामुळे या निवडणुकीत तब्बल साडेआठ हजार पोलिस टपाली मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होणार आहेत.

निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांना सतर्क राहावे लागते. मतदान केंद्रनिहाय बंदोबस्त तैनात करताना मतदानाच्या आदल्या दिवशीच पोलिसांना तेथे मुक्काम करावा लागतो. मतदानानंतर ईव्हीएम मशिन सील करून गोडावूनवर खडा पहारा द्यावा लागतो. या कामाच्या गडबडीत पोलिसांना त्यांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही. 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा आहे. पण, त्यापासूनही पोलिस वंचित राहत होते. त्यामुुळे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी लोकसभा निवडणुकीत पोलिसांनी टपाली मतदान करण्याचे आवाहन केले होते. पण, अनेकांनी मतदान केले नव्हते. यामध्ये १ हजार ७५१ जणांना मतदार यादीत नाव न सापडणे, मतदान केंद्र न सापडणे अशा अडचणी आल्या होत्या.

विधानसभेसाठी १०० टक्के पोस्टल मतदान करून घेण्यासाठी जुलै महिन्यापासून विशेष शाखेकडून काम सुरू करण्यात आले. यामध्ये नोडल ऑफिसर म्हणून वरिष्ठ निरीक्षक मिलिंद गायकवाड यांनी सर्व पोलिस ठाणी व पथकांच्या प्रमुखांशी संपर्क साधून साडेआठ हजार पोलिसांची मतदार यादीतील माहिती अद्ययावत केली. तसेच, पोस्टल मतदानासाठी १२ क्रमांकाचा अर्ज संबंधित पोलिस ठाण्यांकडे पाठवून दिला आहे. त्यावर मतदान करून मतमोजणीच्या दिवसापर्यंत ही मतपत्रिका मतमोजणी केंद्रावर पोचणे आवश्‍यक असते. यासाठी पोस्ट खात्याची खास व्यवस्था असते.

कामाचा व्याप आणि बंदोबस्तामुळे पोलिसांना मतदान करता येत नाही. त्यांनी पोस्टल मतदानाद्वारे या प्रक्रियेत सहभाग घ्यावा, यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी चर्चा करून विशेष शाखेकडे ही जबाबदारी दिली होती. विधानसभा निवडणुकीत सर्व पोलिसांनी मतदान करावे, यासाठी प्रयत्न आहे.
- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT