diwali
diwali sakal
महाराष्ट्र

‘महावितरण’चा सल्ला! दिवाळीत आकाश कंदील कोठे लावावा, ‘या’ बाबी लक्षात ठेवाच; संकटसमयी ‘या’ नंबरवर करा कॉल

तात्या लांडगे

सोलापूर : पुणे प्रादेशिक विभागातील सातारा, पुणे, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा वीज ग्राहकांकडे जवळपास २९० कोटींची थकबाकी आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख ४८ हजार ३०२ ग्राहकांकडे ५२ कोटी १५ लाख रुपयांची थकबाकी आहे. आता ग्राहकांनी संपूर्ण थकबाकी भरावी, अन्यथा वीजपुरवठा खंडित होईल, असा इशारा ‘महावितरण’ने दिला आहे.

‘महावितरण’ची वीज यंत्रणा सार्वजनिक ठिकाणी उभारलेली असून त्यात उच्च व लघुदाबाच्या उपरी वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर- पिलर अशा यंत्रणा उघड्यावर असतात. फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवा. रोहित्र, फ्यूज पेट्या, फिडर पिलर, रिंग मेन युनिटजवळ फटाके फोडू नयेत किंवा त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये अथवा तो जाळू नये. वीजवाहिन्यांना स्पर्श होईल किंवा धोका निर्माण होईल असे रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत. मोकळ्या जागेतच फटाके उडवावेत.

घराच्या किंवा इमारतीच्या रोषणाई करताना विद्युत माळेचे वायर, दिवे, सॉकेट दर्जेदार नसल्यास धोका निर्माण होऊ शकतो. घर किंवा इमारतीचे अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करा. घराबाहेर आकाशकंदील लावताना तुटलेल्या वायरचा वापर टाळावा किंवा तुटलेली वायर चांगल्या दर्जाच्या इन्सूलेशन टेपने सुरक्षित करून घ्यावी. घरगुती उपकरणांसह विद्युत माळेपासून सुरक्षित अंतरावर तेलाच्या वातीचे दिवे लावावेत. विद्युत सॉकेटवर अधिकचा भर टाकू नये, असेही ‘महावितरण’ने स्पष्ट केले आहे.

संकटसमयी ‘या’ नंबरवर करा कॉल

वीजयंत्रणेला आग लागल्यास, धोका निर्माण झाल्यास किंवा वीजपुरवठा खंडित झाल्यास ‘महावितरण’च्या २४ तास सुरु असणाऱ्या कॉल सेंटरच्या १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे ‘महावितरण’ने सांगितले आहे.

आकाश कंदील लावताना ‘हे’ लक्षात ठेवाच...

  • आकाश कंदील किंवा दिव्यांच्या विद्युत माळेसाठी थ्री- पीनचा वापर करा

  • वायर प्लगच्या छिद्रात आगपेटीच्या काड्या खोचून लावू नका; प्लगमध्ये स्पार्कींग सुरु होऊन धोका होईल

  • गॅलरीमधील लोखंडी जाळी किंवा लोखंडी जिन्यापासून विद्युत दिव्यांची व आकाश कंदिलाची वायर दूर ठेवा

  • वायर एकसंघ असावी, तुटलेली किंवा सेलोटेपने जोडलेली नसावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT