महावितरण
महावितरण Sakal
महाराष्ट्र

महावितरणची ‘गो-ग्रीन’ योजना! वीजेचे बिल ऑनलाईन घ्या, होईल १२० रूपयांची बचत; पावणेदोन लाख ग्राहकांची वर्षाला २.०७ कोटींची बचत

तात्या लांडगे

सोलापूर : ‘महावितरण’च्या वीजबिलासाठी कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल पावणेदोन लाख पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे त्यांची वर्षाला दोन कोटी सहा लाख ९४ हजार रुपयांची बचत होत आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील १२ हजार १९७ ग्राहक आहेत.

‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपयांची सवलत दिली जाते. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ई-मेलद्वारे पाठविण्यात येते. सोबतच एसएमएसद्वारे देखील वीजबिलाची माहिती दिली जाते. त्यामुळे बिल भरणा आणखी सोयीचा झाला आहे.

कागदी वीजबिलाचा वापर बंद केला, तरी महावितरणचे मोबाईल ॲप व वेबसाइटवर ग्राहकांसाठी चालू व मागील वीजबिल तसेच वीजबिल भरल्याच्या पावत्यांची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे ‘गो-ग्रीन’ योजनेत सर्व लघुदाब ग्राहकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे. ‘गो-ग्रीन’मध्ये पुणे प्रादेशिक विभागाअंतर्गत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सव्वालाख ग्राहक सहभागी झाले आहेत. त्यातून त्यांची वर्षाला दीड कोटींची बचत होत आहे.

सातारा जिल्ह्यातील ११ हजार ५२५ ग्राहकांचे १३ लाख ८३ हजार रुपये, सोलापूर जिल्ह्यातील १२ हजार १९७ ग्राहकांचे १४ लाख ६३ हजार ६४० रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील १५ हजार ४५७ ग्राहकांचे १८ लाख ५४ हजार ८४० रुपये आणि सांगली जिल्ह्यातील ९ हजार ८७५ ग्राहकांच्या ११ लाख ८५ हजार रुपयांची देखील वार्षिक बचत होत आहे.

११ महिन्यांपर्यंतची बिले ऑनलाईन उपलब्ध

वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी महावितरणचे मोबाईल अ‍ॅप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीत जतन करून ठेवता येईल. तसेच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करता येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT