Manohar-Joshi
Manohar-Joshi 
महाराष्ट्र

जोशी कुटुंबीयांच्या मालमत्तेचा ताबा

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी कुटुंबीयांच्या मालकीच्या स्थावर मालमत्ता विविध बॅंकांकडून घेतलेली देणी फेडता न आल्याने तारण म्हणून ठेवल्याने या मालमत्तांचा ताबा काही बॅंकांनी घेतला आहे. याबाबत जोशी कुटुंबीयांना बॅंकांनी जाहीर नोटिशीद्वारे कळविले आहे.

बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकेचे सुमारे १३ कोटी रुपये, स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे सुमारे ३८ कोटी रुपये; तर बॅंक ऑफ इंडियाचे सुमारे १३ कोटी रुपये, असे एकूण ६४ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थता दाखवली गेल्याचे या तीन बॅंकांच्या निदर्शनास आल्यावर बॅंकांनी ही कारवाई केली आहे.

जोशी कुटुंबीयांनी हे कर्ज घेताना मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि लोणावळा, खंडाळा येथील काही मालमत्ता तारण म्हणून ठेवल्या होत्या. त्या बदल्यात कर्ज घेताना जोशी कुटुंबीयांच्या वतीने मेसर्स कोहिनूर एज्युकेशन ट्रस्ट, मेसर्स हॉटेल एअरपोट कोहिनूर, मेसर्स कोहिनूर प्लॅनेट कन्स्ट्रक्‍शन प्रा. लि. या कंपन्यांसह मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेश मनोहर जोशी, माधवी उन्मेश जोशी, अनघा एम. जोशी हे व्यक्‍तिगत हमीदार आहेत. त्यांना याबाबत बॅंकांनी कळविले आहे. यानुसार ताब्यात घेतलेल्या मालमत्तांबाबत कोणताही व्यवहार करण्यास मनाई केली आहे. असा व्यवहार कोणी केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही. या मालमत्तांबाबत व्यवहार करायचा असेल, तर तो संबंधित बॅंकांना विचारात घेऊन करावा, असे प्रसिद्धीस दिलेल्या जाहिरातीत म्हटले आहे.

मनोहर जोशी कुटुंबीयांवरील कर्ज (आकडे रुपयांत)
१३ कोटी बॅंक ऑफ महाराष्ट्र
३८ कोटीस्टेट बॅंक ऑफ इंडिया
१३ कोटी बॅंक ऑफ इंडिया 
६४ कोटी एकूण थकबाकी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT