Shivsena
Shivsena 
महाराष्ट्र

शिवसेनेला मंत्रिपदासह उपसभापतिपदाची आस

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील स्थापन होणाऱ्या नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेला चार मंत्रिपदे आणि राज्यसभेच्या उपसभापतिपदाची आस लागली असून, लवकरच भाजपकडे या पदांची मागणी करण्यात येणार असल्याचे समजते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला दोन कॅबिनेट, दोन राज्यमंत्रिपदासह लोकसभेचे उपसभापतिपद मिळण्याची चर्चा आहे. मोदी यांच्यासह पहिल्या टप्प्यात काही ठराविक मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री, तसेच लोकसभेचे उपाध्यक्ष किंवा राज्यसभेचे उपसभापतिपद मिळणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. उत्तर पश्‍चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर हे सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाले आहेत. त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. कीर्तिकर यांच्यासह संजय राऊत, प्रतापराव जाधव, भावना गवळी, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत यांची नावे केंद्रातील सत्तेसाठी आघाडीवर आहेत.

आदित्य ठाकरे विधानसभा लढवणार
"हीच वेळ आहे, हीच संधी आहे. लक्ष- विधानसभा. महाराष्ट्र वाट पाहतोय,' अशा आशयाची माहिती युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी आज इन्स्टाग्रामवरून दिली अन्‌ आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या शक्‍यतेने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. या माहितीसोबत सरदेसाई यांनी आदित्य ठाकरे यांची गळाभेट घेतल्याचे छायाचित्रदेखील प्रसारित केल्याने आदित्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, हे नक्‍की असल्याची चर्चा सुरू झाली. लोकसभेच्या यशानंतर शिवसेनेत उत्साह आहे. या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाची कसोटी होती. महाराष्ट्रात त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक प्रचाराची धुरादेखील सांभाळली होती. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक आदित्य यांनी स्वत: लढवावी, असा आग्रह युवासेना पदाधिकाऱ्यांनी धरला आहे. युती परत मजबूत झाल्याने सत्तेचा वाटा दोन्ही पक्षांत सामंजस्याने सोडवण्यात आला आहे. विधानसभेची तयारी म्हणून आता राज्यमंत्रिमंडळाचा विस्तारदेखील होण्याची चिन्हे आहेत. त्या वेळीच आदित्य यांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी दिली जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

Crime News: भर कोर्टात 13 महिन्यांच्या बाळाला तिने जमिनीवर आपटलं; न्यायमूर्तीही झाले सुन्न

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Latest Marathi News Live Update : राहुल अन् प्रियांका गांधींनी देशाची माफी मागावी; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक

SCROLL FOR NEXT