Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Haryana Politics: जननायक जनता पक्षाचे नेते यापूर्वी भाजप आणि जेजेपी पक्षाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. आता चौटाला यांच्या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.
Dushyant Chautala
Dushyant ChautalaEsakal

हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी हरियाणा सरकारबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, सध्या भाजप सरकार अल्पमतात आहे, सरकार पाडायचे असेल तर आपण काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देण्यास तयार आहोत.

जननायक जनता पक्षाचे नेते यापूर्वी भाजप आणि जेजेपी पक्षाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होती. आता चौटाला यांच्या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. (Dushyant Chautala Says Will Help Congress To Topple BJP Government In Haryana)

हिसारमध्ये दुष्यंत चौटाला नव्याने स्थापन झालेल्या सैनी सरकारवर ताशेरे ओढताना म्हणाले की, आपण काही दिवसांसाठीच मुख्यमंत्री झालो आहोत, हे सैनी यांना आधीच माहित आहे. दुष्यंत चौटाला म्हणाले की, आमचे 10 पैकी 10 आमदार आमच्यासोबत आहेत आणि जर कोणी JJP ला फसवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.

तीन अपक्ष आमदारांनी हरियाणातील भाजपच्या नायब सिंग सैनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. या आमदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. आमदार सोंबीर सांगवान, रणधीर गोलेन आणि धरमपाल गोंदर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला.

दुष्यंत चौटाला म्हणाले की, गेल्या काही तासांत हरियाणाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. 3 अपक्ष आमदारांनी सैनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर सैनी यांनी बहुमत दाखवावे अन्यथा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. आता सरकारकडे फक्त २ अपक्ष आमदार उरले आहेत.

Dushyant Chautala
Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

दुष्यंत चौटाला म्हणाले की, मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत आम्ही सत्तेत होतो, तेव्हा कोणत्याही आमदाराने सरकारचा पाठिंबा काढून घेतलेले पाहिले नाही.

भूपिंदर हुड्डा यांच्याकडे मागणी करताना चौटाला म्हणाले की, सरकारला घेरण्याची हीच योग्य संधी आहे, काँग्रेस सरकार पाडण्यासाठी पुढे आली तर आमचा याला पूर्ण पाठिंबा असेल. नायब सैनी यांनी बहुमत सिद्ध करावे अन्यथा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले. त्यांचे सरकार अल्पमतात आहे. याशिवाय दिग्विजय चौटाला यांनी भूपिंदर सिंग हुड्डा यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा करण्याची मागणीही केली आहे.

Dushyant Chautala
Viral Video: लिफ्टमध्येच कुत्र्याचा मुलीवर हल्ला, चावा घेताच...; पाहा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

हरियाणातील राजकीय संकटादरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

खट्टर म्हणाले, "देशात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे, कोण कुठे जातो आणि कुठे जात नाही याचा कसलाही होणार नाही. अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे कोणीही काळजी करण्याची गरज नाही."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com