#Maratha kranti morcha in social media
#Maratha kranti morcha in social media 
महाराष्ट्र

#MarathaKrantiMorcha सोशल मीडियावरील आंदोलनाची धग

सकाळवृत्तसेवा

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभर मराठा क्रांती मोर्चाची आंदोलने सुरू आहेत. जागो जागी रस्ता रोको, बंद पुकरण्यात येत असताना सोशल मिडीयावरही आंदोलनाची धग वाढली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या संदर्भात ट्विटरवर पोस्टचा पाऊस पडत असून, मागील दोन-तीन दिवसात मुख्यमंत्र्यांपासून अनेकांनी केलेल्या वादग्रस्त विधानांचा समाचारही ट्विटवर घेण्यात येत आहे. यात प्रामुख्याने राज्यातील मराठा आमदारांच्या राजीनाम्यांची मागणी होत असून, भाजप-शिवसेनेवर निशाना साधला जात आहे.

यातील काही मोजक्या ट्विट्स.
आज तीन खासदारांना संसदेत बोलण्यास भाग पाडले...उद्या एक मराठा आमदार पदाचा राजीनामा देणार आहे....फरक पडतोय मराठ्यांनो फक्त जोर लावा. व्यवस्थेला वाकवण्याची ताकद तुमच्या आमच्या लेखणीत आहे. 
- दिलीप डाळीमकर

मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राजीनामा देणाऱ्या पहिल्या बहाद्दर सत्ताधारी मराठा आमदाराची वाट आतुरतेने पाहत आहे. सकल मराठा समाज..........!!!! सामूहिक राजीनामा तर पर्वणीच ठरेल!
- मराठा अमोल

यापुढे आमचा शिवसेनेला फक्त पाठिंबा. मतदान नाही. 
- जतीन पवार

सर्व 145 मराठा आमदार आणि खासदारांनी राजीनामे दिले तरी मराठा समाज त्यांना दारासमोर उभं करणार नाही. कारण त्यांना 4 वर्ष विधानसभेत मराठा आरक्षणाबद्दल बोलता आले नाही. आज समाज रस्त्यावर उतरल्यावर त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे राजीनाम्याची नाटकं नको आहेत.
- अतुल पाटील

चंद्रकांत पाटलांनी बेजबाबदार विधाने करून आगीत तेल ओतू नये. नहीतर तिच आग तुमच्या मागे लागेन...
- नवनाथ कारपे

महाराष्ट्रात दोन मराठे : एक राजकीय मराठे दुसरे सर्वसामान्य मराठे...!! सर्वसामान्य मराठे जगण्यासाठी संघर्ष करतायत. राजकीय मराठे पक्षांनी दिलेल्या जहागिऱ्या वाचवण्यासाठी आपसात भांडतायत. मराठा समाजाच भयाण वास्तव.!!
- मराठा क्रांती मोर्चा

मराठा आंदोलकांना पेड समाजकंटक म्हणणा-या "पेड" नेत्याने #कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघात निवडून यावे...
- अनिल शिंदे

मराठा क्रांती मोर्चाने शांततेत 58 मोर्चे काढले काय मिळाले? चर्चेचे गुऱ्हाळ आणि खोटी आश्वासने...वारित साप सोडणार, चेंगराचेंगरी ही वक्तव्ये... आंदोलकांना समाजकंटक संबोधने... अशी मीठ चोळणारी वक्तव्य... महाराष्ट्रातील सद्यपरिस्थितीला जबाबदार.
- अनिल शिंदे

देशात नरेद्र ,महाराष्ट्रात देवेंद्र आणि त्यात आमचे 145 दलिंद्र   म्हणून  एक बळी गेला काहीच कामाचे नाही
भावपूर्ण श्रद्धांजली.
- अनिल टेकाले

या सर्व पोस्ट मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, मराठा समाजाच्या आमदार याच्यावर निशाला साधला जात आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT