चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील 
महाराष्ट्र

‘संभाजीराजेंनी धरसोड वृत्ती ठेवू नये’ - चंद्रकांत पाटील

नामदेव कुंभार

इस्लामपूर : मराठा आरक्षणावर रणशिंग फुंकलेल्या खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेवर पाटील यांनी भूमिका मांडली. ‘‘संभाजीराजे छत्रपती हे आमचे राजे आहेत. त्यामुळे त्यांचे नेतृत्व मान्य करायला कोणतीच अडचण नाही. भाजपचे खासदार आहेत की नाही याबाबत राजेंच्या मनात संभ्रम आहे. कागदोपत्री ते भाजपचेच खासदार आहेत. मात्र राजे स्वत:ला ‘राष्ट्रवादी’च्या कोट्यातून खासदार झाल्याचे मानतात. त्या वादात आम्हाला जायचे नाही. मात्र संभाजीराजेंनी धरसोड वृत्ती ठेवू नये. एकदा काय करायचे आहे ते त्यांनी पक्के ठरवावे. ते कधी म्हणतात,‘मी ६ तारखेपर्यंत वाट बघणार, त्यांना या सरकारची वाट लावायची की वाट बघायची आहे? कधी म्हणतात रणशिंग फुंकले, कधी म्हणतात कोल्हापुरातून मोर्चा काढणार... मग म्हणतात कोरोना आहे, मोर्चा काढणे बरोबर नाही... आता म्हणतात, आम्ही कोल्हापूरच्या दसरा चौकात लोकप्रतिनिधींना जनतेद्वारे प्रश्न विचरणार... यातून काय आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे काय?,’’ असा सवाल त्यांनी केला. आता भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे, पण मराठा समाजाला असे वाटू नये की याला राजकीय रंग चढू लागला आहे. त्यामुळे हे आंदोलन कुणीही करावे, आम्ही तुमच्या बरोबर आहे, अशी भूमिका आम्ही वारंवार घेतली आहे, असे ते म्हणाले.

‘‘मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादी पंतप्रधानांना एक कोटी पत्र लिहिणार आहे, ती पत्रे उद्धव ठाकरे यांना लिहिण्याऐवजी पंतप्रधानांना लिहीत आहेत. त्यांचा पत्ता चुकला आहे. मराठा आरक्षणाबाबत त्यांची केंद्राकडे बोट दाखवून चालढकल सुरू आहे. या सरकारने मराठा आरक्षणाबाबत झोपेचे सोंग घेतले आहे.’’, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला चार वर्षे काम करावे लागेल. या चार वर्षांत मराठा समाजाला वाऱ्यावर सोडून चालणार नाही, असेही ते म्हणाले. पेठ (ता. वाळवा) येथे व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेत वनश्री नानासाहेब महाडीक यांचे तैलचित्र अनावरण व भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकार गेले म्हणून आमच्यावर ‘पोटात दुखतेय’ असा आरोप केला जातो. पण त्यांनी लक्षात ठेवावे केंद्रासह, अठरा राज्यांत आमची सत्ता असताना एका राज्यासाठी कशाला आमच्या पोटात दुखेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT