Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil esakal
महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा आरक्षण हवे ५० टक्क्यांमधूनच - मनोज जरांगे पाटील

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - मराठा समाजाचे स्वतंत्र १० टक्के आरक्षण स्वीकारावे, अशी सरकारची इच्छा असेल तर ते ५० टक्क्यांच्या आत असावे. मराठा समाज मागास सिद्ध झाल्याने ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज केली. केंद्र सरकारला घटनादुरुस्ती करण्यास सांगून आरक्षणाची मर्यादा वाढवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयातून जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘मराठा मागास सिद्ध झालेली जात असल्याने त्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात करणे शक्य आहे. अन्यथा ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण द्यावे. १० टक्के आरक्षण दिले तरी ‘एसईबीसी’च्या सवलती त्यात लागू करा.

‘ईडब्ल्यूएस’ रद्द न करता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या नोकरी आणि शिक्षणाचा फायदा घेऊ द्या’, असे जरांगे म्हणाले. माझ्यावर टीका करणाऱ्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी. ‘सगेसोयरे’ अधिसूचनेची कायद्यात अंमलबजावणी करण्याच्या मुद्द्यावर मी ठाम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोष ओढवून घेण्याऐवजी निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

उच्च न्यायालयाने आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे. तरीही पोलिस आडकाठी आणत आहेत. सरकारने आंदोलकांना खुन्नस दाखवू नये. सध्या परीक्षांमुळे आंदोलने स्थगित आहेत. पण ती पुन्हा सुरू होतील, असे जरांगे यांनी सांगितले.

राजकारण माझा मार्ग नाही

मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवावी, असे ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर सांगितले. याविषयी जरांगे म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांचा शब्द टाळणे जड जाते. परंतु राजकारण माझा मार्ग नाही. माझ्यासाठी आरक्षण हा ज्वलंत मुद्दा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT