MarathaKrantiMorcha threat of Maratha movement
MarathaKrantiMorcha threat of Maratha movement 
महाराष्ट्र

#MarathaKrantiMorcha परिवहन खात्याला मराठा आंदोलनाची धास्ती

तात्या लांडगे

सोलापूर : मागील सहा-सात दिवसांपासून मराठा समाजाने आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी राज्यभरात तीव्र आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलक सरकारविरोधात आक्रमक झाले असून मराठवाड्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात राज्य परिवहनच्या तब्बल 182 बसेसची तोडफोड केली आहे. तर मंगळवारी काही जिल्ह्यांमधील परिवहन सेवा बंद तर काही ठिकाणी टप्प्याटप्याने सुरु होती.

आरक्षणाच्या आंदोलनामुळे राज्य परिवहनचे तब्बल 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती राज्य परिवहन विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली. दिवसेंदिवस सरकार आणि मराठा समाज यांच्यातील दरी वाढत असून आता आरक्षणाच्या मुद्‌द्‌यांवरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर परिस्थिती पाहून राज्यातील मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील परिवहन सेवा बंद करण्यात आली आहे. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी पूर्णपणे सेवा बंद करण्यात आली आहे.

अहमदनगर, मुंबई, ठाणे, पालघर, नागपूर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, पुणे यासह बहुतांशी जिल्ह्यांमध्ये बसेसची तोडफोड झालेली नसून सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबादसह काही जिल्ह्यांमध्ये बसेस फोडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सोलापूर विभागातील सर्वाधिक 83 बसेसचा समावेश असल्याचेही परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. 

श्री विठ्ठलाच्या भक्‍तीसाठी आलेल्या वारकऱ्यांना व्यवस्थीतपणे घरी जावू द्यावे. राज्य परिवहनची सेवा ही सर्वसामान्यांसाठीच असून आंदोलनकर्त्यांनी एसटी बसेसला टार्गेट करु नये.- दिवाकर रावते, परिवहन मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT