residentional photo
residentional photo 
महाराष्ट्र

नाशिक-जळगाव-नगरमध्ये 6 ते 8 जानेवारीस  तुरळक ठिकाणी थंडीची लाट

सकाळवृत्तसेवा

नाशिक ः भारतीय हवामानशास्त्र विभागाने उद्यापासून 9 जानेवारीपर्यंत सकाळी 7 ते 8, तर रात्रीच्यावेळी 6 ते 7 अंश सेल्सिअस तापमानाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच या विभागाने उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नगर जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीच्या लाटेची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. 

जिल्ह्याच्या विविध भागामध्ये रेंगाळलेल्या थंडीत शितलहर पसरलेली असताना पारा 5 अंश सेल्सिअसच्या खाली घसरली होता. त्यातच अनेक ठिकाणी हिमनगाचे बर्फामध्ये रुपांतर झाले होते. अशा भागातील तापमान वाढत असतानाच उन्हाचा चटका बसू लागला आहे. त्यामुळे आता द्राक्षांचे मणी उखडण्याबरोबर "सन-बर्न'चा परिणाम डोळ्यांना दिसू लागला आहे, असे सांगून द्राक्ष बागायतदार संघाचे कैलास भोसले म्हणाले, की संघाच्या हवामान केंद्राच्या माहितीनुसार येत्या तीन दिवसांमध्ये 6 अंश सेल्सिअसहून अधिक, तर 10 जानेवारीपासून 10 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक किमान तापमान राहण्याची शक्‍यता आहे. त्याचवेळी 10 जानेवारीपासून आठवडाभर ढगाळ हवामान राहण्याचा केंद्राचा अंदाज आहे. ही परिस्थिती आल्यानंतर द्राक्षांचे नेमके किती नुकसान झाले हे स्पष्ट होण्यास मदत होईल. शिवाय बागांची मुळे व पानांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया पूर्वपदावर येण्यास मदत होईल. 

नगरमध्ये 7.6 अंश सेल्सिअस पारा 
राज्यात सर्वात कमी म्हणजेच 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नगरमध्ये झाली आहे. नाशिकमध्ये 8.5, तर मालेगावमध्ये 10.6 अंश सेल्सिअस तापमान राहिले. राज्यातील इतर ठिकाणचे आजचे नोंदवलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये असे ः कुलाबा-18.6, सांताक्रूझ-15, अलिबाग-16.2, रत्नागिरी-16.2, पणजी-17.8, डहाणू-14.9, पुणे-8.8, जळगाव-7.6, कोल्हापूर-14.4, महाबळेश्‍वर-14.7, सांगली-10.8, सातारा-10.6, सोलापूर-14.4, औरंगाबाद-10.4, परभणी-10.9, नांदेड-10.5, अकोला-9.7, अमरावती- 12.2, बुलढाणा-12, चंद्रपूर-11.8, गोंदिया-9.5, नागपूर-8.1, वाशिम-11.6, वर्धा-12, यवतमाळ-12.4 
.... 

इगतपुरी विभागीय कृषी संशोधन 
केंद्राचा शेतकऱ्यांना सल्ला 
0 फळबाग, उभ्या रब्बी पिकांना रात्रीच्यावेळी पाणी द्यावे 
0 थंडीपासून फळबागा, पशू-पक्ष्यांचे संरक्षण करावे 
0 गव्हावरील मावा कीडीचे नियंत्रण करावे 
0 फुलोरा, शेंगा भरण्याच्या अवस्थेतील तुरीवरील घाटे अळी, पिसारी पतंग, शेंगमाशीचे नियंत्रण हवे 
0 हरभऱ्यावरील घाटे अळीचा प्रादुर्भाव रोखावा 
0 कांद्यावरील रस शोषणाऱ्या कीडीचा बंदोबस्त करावा 
0 टोमॅटोला बांबू अथवा सुतळीचा आधार द्यावा 

15 जानेवारीपर्यंत थंडीचा 
"क्रॉपटेक' केंद्राचा अंदाज 

"क्रॉपटेक'तर्फे नाशिक जिल्ह्यातील 58 सह महाराष्ट्रातील 110 ठिकाणी हवामानाची नोंद होते. त्यानुसार येत्या 15 जानेवारीपर्यंत राज्यात थंडी राहण्याचा अंदाज केंद्राने वर्तवला आहे. केंद्राच्या अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार रात्री दोन पर्यंत 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेल्या अनेक भागात यापूर्वी 1 ते 2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. पहाटे तीनपासून सकाळी सहापर्यंत तापमानात घसरण झाली होती. मात्र आता 15 जानेवारीपर्यंत पहाटे तीन पासून सकाळी सहापर्यंत 5 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहण्याची शक्‍यता आहे. बागायती भागामध्ये या तापमानात आणखी घसरण होण्याची शक्‍यता अधिक आहे. मात्र 15 जानेवारीनंतर महिनाखेरपर्यंत 10 ते 15 अंश सेल्सिअस किमान तापमान राहण्याची चिन्हे आहेत, असेही अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. 
.. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT