महाराष्ट्र

क्षयरोग तपासणीसाठी मुंबईत पाच विशेष प्रयोगशाळा 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई -  क्षयरोगासंदर्भात अधिकचे संशोधन करण्यासाठी जे. जे. रुग्णालयात अत्याधुनिक संशोधन केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. क्षयरोग तपासणीसाठी मुंबईत तीन प्रयोगशाळा सुरू असून आणखी दोन प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहेत, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज विधानसभेत सांगितले. 

पराग आळवणी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री बोलत होते. आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात एकूण नोंदविलेल्या क्षयरुग्णांपैकी साधारणात: 18 ते 20 टक्के रुग्ण मुंबईत आढळून येतात. क्षयरोगाच्या संनियंत्रणासाठी मुंबई शहरात स्वतंत्र 24 जिल्हा क्षयरोग केंद्र आहेत. राज्यात 517 क्षयरोग उपचार पथके असून, मुंबईत 59 पथक कार्यरत आहेत. संशयित रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासण्यासाठी राज्यभरात 1,520 सूक्ष्मदर्शी केंद्रे असून, त्यातील 130 केंद्र मुंबईत आहेत. 

नियमित औषधोपचारास जे रुग्ण दाद देत नाहीत अशा "एमडीआर', "एक्‍सडीआर' बाधीत रुग्णांची प्रयोगशाळा तपासणीसाठी राज्यात 12 डीएसटी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. त्यापैकी मुंबईत पाच ठिकाणी या प्रयोगशाळा केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जे. जे. रुग्णालय, हिंदुजा रुग्णालय, जीटीबी रुग्णालय, मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लॅबोरेटरी व एसआरएल येथे प्रयोगशाळा मंजूर झाल्या आहेत. त्यातील जे. जे. आणि हिंदुजा येथील प्रयोगशाळा कार्यरत असून सहा महिन्यांत उर्वरित प्रयोगशाळा सुरू होतील. 

या रोगाचे निदान लवकर होण्याकरिता राज्यात एकूण 117 सीबीनॅट यंत्रे उपलब्ध असून त्यापैकी मुंबईत 28 यंत्रे आहेत. राज्यात क्षयरोग संशयितांची मोफत एक्‍सरे तपासणी केली जाते, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईसह राज्यभरात क्षयरोगासंदर्भात घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यावर भर दिला जात आहे. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2025 पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी चारसूत्री पद्धतीने कार्यक्रम राबविला जात आहे. मुंबई शहरात पूर्व व पश्‍चिम उपनगरांमध्ये क्षयरुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत असल्याचे सांगून आरोग्यमंत्री म्हणाले की, प्रदूषणामुळे होणाऱ्या क्षयरोगाच्या तपासणीसाठी डॉक्‍टरांचे विशेष पथक नेमून त्याद्वारे तपासणी करण्यात येईल. बुलडाण्याचे क्षयरोग रुग्णालय येत्या सहा महिन्यांत कार्यान्वित करण्यात येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT