Nawab Malik
Nawab Malik 
महाराष्ट्र

गिरीश महाजनांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा: नवाब मलिक

प्रशांत बारसिंग

मुंबई : स्वसंरक्षणासाठी दिलेल्या बंदुकीचा गैरवापर करत वन्यजीव कायदयाचा भंग करणारे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

जळगाव जिल्हयातील चाळीसगाव तालुक्यातील वरखेडेमध्ये नरभक्षक बिबटयाला मारण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्याचवेळी सरकारमधील मंत्री गिरीश महाजन स्वत:च्या संरक्षणाला दिलेली बंदूक घेवून बिबटयाला मारायला बाहेर पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार आक्षेप घेतला आहे.

या मंत्र्यांचा हा पहिलाच प्रताप नाही आहे. याअगोदर हे मंत्री विधानसभेत बंदूक घेवून आले होते. तर  मुलांच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी बंदूक दाखवली होती आणि दुसरीकडे दारुच्या दुकानाला महिलांचे नाव देण्याचे वादग्रस्त विधानही त्यांनी केले होते. आत्ता तर चक्क बिबटयाला मारण्यासाठी खुलेआम बंदूक घेवून फिरताना दिसत आहेत. त्यांनी स्वसंरक्षणासाठी दिलेल्या बंदुकीचा गैरवापर केला असून त्यांनी वन्यजीव कायदयाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन लगेचच खटला चालवावा अशी आमची सरकारकडे मागणी असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

दरम्यान भाजप मंत्री गिरीश महाजनांवर सरकार कारवाई करणार नसेल तर आम्ही दिल्लीतील संबंधित नियुक्त अधिकाऱ्याकडे तक्रार करणार असल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT