fire
fire 
महाराष्ट्र

कमला मिल आगप्रकरणी पब मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काल रात्री साडेबारा वाजता भीषण आग लागली. या आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रेस्टॉरंट आणि पब मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमला मिल कंपाउंडमधील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रात्री भीषण आग लागली. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेक जण गंभीर जखमी झाले. जखमींवर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून देण्यात आली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल होत्या. आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात होते.

कमला मिल कंपाऊंडमधील 'हॉटेल मोजोस ब्रिस्टोल' आणि 'वन-अबव्ह'ला भीषण आग लागली. याप्रकरणी मालक अभिजीत मानका, जिगर संघवी आणि हितेश संघवी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरून या घटनेबाबत चिंता व्यक्त केली. आगीचे वृत्त समजल्यावर खूप चिंता वाटली. यातील बाधित कुटुंबीयांचे सांत्वन करतो. तसेच यामध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करणाऱ्या अग्निशमन दलाची त्यांनी प्रशंसा केली.

''या घटनेबद्दल शोक व्यक्त करतो. यामध्ये जखमी झालेले लवकरच बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो'', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT