विवाह नोंदणी कार्यालय - मास्क घालून आपल्या वैवाहिक आयुष्याला दांपत्याने सुरवात केली. या वेळी मोजकेच नातेवाईक आणि विवाह नोंदणी अधिकारी उपस्थित होते.
विवाह नोंदणी कार्यालय - मास्क घालून आपल्या वैवाहिक आयुष्याला दांपत्याने सुरवात केली. या वेळी मोजकेच नातेवाईक आणि विवाह नोंदणी अधिकारी उपस्थित होते. 
महाराष्ट्र

Coronavirus : मास्क लावूनच ‘शुभमंगल’; नवदांपत्यांकडून कोरोनाबाबत खबरदारी

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाने जगभरातील नागरिकांचे जीवनमान बदलून टाकले आहे. येथील विवाह नोंदणी कार्यालयात नवदांपत्य मास्क लावून विवाहाच्या पवित्र बंधनात अडकले; तर गुरुवारी लग्नाचा मुहूर्त असूनही नेहमीच्या तुलनेत विवाह नोंदणीत तुलनेने घट झाल्याचे दिसून आले.

शहरातील विवाह नोंदणी कार्यालयात दररोज साधारण आठ-दहा विवाहाची नोंदणी होते. तसेच लग्नाच्या मुहूर्ताच्या दिवशी ३० ते ३५ जोडपी विवाहबद्ध होतात. परंतु सध्या कोरोनामुळे काही जोडप्यांनी विवाह नोंदणी पुढे ढकलली आहे. 

इच्छुक वर-वधूंना विवाह नोंदणीसाठी एक महिना अगोदर विवाह नोंदणी कार्यालयात लेखी पूर्वसूचना आणि अर्ज भरून देणे आवश्‍यक असते. त्यानंतर विवाह नोंदणी कार्यालयाकडून इच्छुक वधू-वरांना पुढील दोन महिन्यांची मुदत दिली जाते. ही मुदत संपत असल्यामुळे काही जोडपी विवाहबद्ध होत आहेत. 

लग्नाचा मुहूर्त असूनही कोरोनामुळे काही इच्छुक वधू-वरांना इच्छा असूनही विवाहासाठी येता आले नाही. मुहूर्ताच्या दिवशी ३० ते ३५ जोडपी विवाहबद्ध होतात. परंतु आज केवळ दहा जोडपी विवाहबद्ध झाली. 
- भालचंद्र पोळ, प्रभारी विवाह अधिकारी, पुणे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT