maruti-chitampalli
maruti-chitampalli 
महाराष्ट्र

मारुती चितमपल्लींना राज्य सरकारचा पुरस्कार 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राज्याच्या मराठी विभागाच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार भारतीय विचार साधना प्रकाशनास आणि विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच, यंदाचा मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार श्‍याम जोशी यांना आणि डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी आज एका पत्रकाद्वारे दिली. 

व्यावहारिक नफा-तोटा न पाहता, प्रामुख्याने राष्ट्रभक्ती व राष्ट्रपुरुष आणि समाजसेवा व समाजसेवक असे अनेक विषय व आनुषंगिक विचार विविध चरित्र पुस्तिकांच्या आणि ग्रंथांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविणाऱ्या भारतीय विचार साधना प्रकाशनास यंदाचा श्री. पु. भागवत पुरस्कार देण्यात येणार आहे. 

पर्यावरण आणि वन्यजीवन हे क्षेत्र मराठी भाषेच्या परिघात समृद्ध करणाऱ्या आणि कोशनिर्मितीच्या माध्यमातून मराठी भाषेला असंख्य नवे शब्द देणाऱ्या अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना यंदाचा विंदा करंदीकर पुरस्कार देण्यात येणार आहे. 

अत्युच्च त्याग करून सुमारे अडीच लाखांच्या ग्रंथसंपदेचा संग्रह करून, हजारो लोकांपर्यंत मराठी साहित्याचे विविध प्रकार पोचविणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील ग्रंथसखा वाचनालयाचे संस्थापक श्‍याम जोशी यांना यंदाचा मंगेश पाडगावकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

मराठी व्याकरणाच्या अध्वर्यू आणि कोश, व्याकरणाचे नियम, म्हणी व वाक्‍प्रचार आणि शालेय शिक्षणातील मराठी या सर्वच बाबतीत उत्तम पुस्तकांद्वारे मार्गदर्शन करणाऱ्या प्रसिद्ध व्याकरणतज्ज्ञ व भाषाशास्त्रज्ञ यास्मिन शेख यांना या वर्षीचा अशोक केळकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

श्री. पु. व विंदा पुरस्कार निवड समितीमध्ये श्रीपाद भालचंद्र जोशी, बाबा भांड यांचा समावेश होता. तर पाडगावकर व केळकर पुरस्कार समितीत डॉ. सदानंद मोरे, शामा घोणसे व बाबा भांड यांचा समावेश होता. तावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने ह्या पुरस्कारांबाबत निर्णय घेण्यात आला. 

मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच, 27 फेब्रुवारी 2017 रोजी हे चारही पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती तावडे यांनी दिली. 

श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार- भारतीय विचार साधना प्रकाशन 
विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार- मारुती चितमपल्ली 
मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार- श्‍याम जोशी 
अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार- ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ श्रीमती यास्मिन शेख 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT