Doctor
Doctor 
महाराष्ट्र

निवृत्तिवेतनासाठी मेडिक्‍लेम आवश्‍यक

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सरकारी कर्मचारी असाल आणि निवृत्तिवेतनासाठी अर्ज करणार असाल, तर त्यासाठी विमाछत्र अर्थात मेडिक्‍लेम घेणे आवश्‍यक आहे. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पती वा पत्नीने आधीच मेडिक्‍लेम घेतला असेल, तर पुन्हा हे विमाकवच घेण्याची गरज नाही.

राज्य सरकारी सेवेत अंतिम वर्षात पदार्पण करणारे, नुकतेच सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचारी, तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांसाठी वैद्यकीय विमा सक्तीचा आहे. निवृत्तिवेतनासाठी अर्ज करतानाच त्याची पूर्तता करावी लागणार आहे. अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती नसल्याने निवृत्तिवेतनासाठी अर्ज करताना वैद्यकीय विमा हवा की नको याबाबत विसंगत माहिती मिळत आहे.

निवृत्तिवेतनासाठी वैद्यकीय विमा काढणे आवश्‍यक असल्याचे कोशागार अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. राज्य सरकारने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी गट विम्याची योजना लागू केली आहे, त्यासाठी माफक दरातही विमा उपलब्ध करून दिलेला आहे. प्रत्येकाने हे विमाछत्र घेतले पाहिजे; परंतु एक जुलै २०१९ ते ३० जून २०२० या कालावधीत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सरकारने उपलब्ध करून दिलेल्या विमा कंपनी व्यतिरिक्त अन्य कंपनीकडून वैद्यकीय विमा पॉलिसी घेतली असेल, तर त्यांना नव्याने पॉलिसी घेण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT