Maharashtra Police
Maharashtra Police Esakal
महाराष्ट्र

Maharashtra Police : पोलिस उपनिरीक्षक संवर्गाची गुणवत्ता यादी जाहीर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२१ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ५८५ उमेदवारांची ही यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

त्यात अजय कळसकर यांनी ३२९.५० गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला असून बाळासाहेब दराडे यांनी ३२६.५० गुण मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. यंदा तिसरा क्रमांक सागर भाबड आणि रशीद शेख यांनी ३२३ गुण मिळवत संयुक्तपणे पटकावला आहे.

परीपत्रकात आयोगाने अनाथ आरक्षणासंदर्भात स्पष्टता दिली आहे. आयोग म्हणतो, ‘परीक्षेतील पोलीस उप निरीक्षक संवर्गाच्या अनाथ आरक्षणासंदर्भात ५ एप्रिल २०२४ रोजीच्या आदेशानुसार अनाथांची २ पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये समाविष्ट करून एकूण ३७८ पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची आहे. उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये किंवा शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT