MHADAs most expensive home
MHADAs most expensive home 
महाराष्ट्र

म्हाडाचे सर्वांत महागडे घर साडेपाच कोटींचे! 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईत घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने ऐन दिवाळीत दिलासा दिला आहे. म्हाडाने 1,384 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. कांदिवली, पवई, अँटॉप हिल, प्रतीक्षानगर, मुलुंड आणि मानखुर्द येथे ही घरे आहेत. यात सर्वाधिक महागडी दोन घरे धवलगिरी (कंबाला हिल), ग्रॅण्ट रोड येथे आहेत. त्यांची किंमत पाच कोटी 80 लाख आहे. सर्वांत स्वस्त घराची किंमत 14 लाख 61 हजार आहे. 

या घरांसाठी 5 ते 10 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. 16 नोव्हेंबरला घरांसाठी सोडत जाहीर केली जाणार आहे. अँटॉप हिल वडाळा येथे 278 घरे, प्रतीक्षानगर सायन येथे 89, गव्हाणपाडा मुलुंड 269, पीएमजीपी मानखुर्द 316, सिद्धार्थनगर गोरेगाव 24, महावीरनगर कांदिवली 170 आणि तुंगा पवई येथे 101 घरे आहेत. तसेच मुंबई मंडळातर्फे मिळालेल्या 50 घरांचा आणि विकास नियंत्रण विनियम 33 अंतर्गत मिळालेल्या 19 घरांचाही यात समावेश आहे. म्हाडाच्या विखुरलेल्या 68 घरांसह आधीच्या सोडतीत वितरीत न झालेली विविध ठिकाणची घरेही सोडतीत आहेत. 

सोडतीत अत्यल्प गटासाठीच्या घराची किंमत 20 लाख व त्यापेक्षा कमी आहे. अल्प उत्पन्न गटासाठी 20 ते 35 लाख, 
मध्यम उत्पन्न गटासाठी 35 ते 60 लाख आणि उच्च उत्पन्न गटासाठी 60 लाखांपासून पुढे घरांची किंमत आहे. सर्वांत कमी किमतीचे घर चांदिवली पवई येथे 14 लाख 61 हजारांचे आहे. या सोडतीतून म्हाडाला 587 कोटी 11 लाखांचा महसूल मिळेल, अशी माहिती मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांनी दिली. 

उत्पन्नाची मर्यादा 

गट ः उत्पन्न 
अत्यल्प गट ः 25 हजारांपर्यंत 
अल्प गट ः 25 ते 50 हजारांपर्यंत 
मध्यम गट ः 50 ते 75 हजारांपर्यंत 
उच्च उत्पन्न गट ः 75 हजार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT