महाराष्ट्र

दूध उत्पादनाला टंचाईची झळ

गजेंद्र बडे

पुणे - पुणे शहर व जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई रौद्र रूप धारण करू लागली आहे. यामुळे दुभत्या जनावरांना पुरेशा प्रमाणात हिरवा चारा मिळेनासा झाला आहे. शिवाय, पिण्याच्या पाण्यावाचूनही दुभत्या जनावरांची मोठ्या प्रमाणात आबाळ होऊ लागली आहे. त्याची झळ दूध उत्पादनाला बसू लागली आहे. परिणामी, दूध उत्पादनात २० टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादन प्रतिदिन सुमारे चार लाख लिटरने घटले आहे.

दुभत्या जनावरांना पिण्यासाठी थंड पाणी असावे लागते. यामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. परंतु, सध्या जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने जनावरांना थंड पाणी तर सोडा, साधे पाणीही पुरेशा प्रमाणात मिळेनासे झाले आहे. त्यातच हिरव्या चाऱ्याचा अभाव आहे, असे पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज डेअरी) कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘हिवाळा व पावसाळ्यात मुबलक प्रमाणात हिरवा चारा आणि पिण्याचे पाणी उपलब्ध असते. त्यामुळे या दोन ऋतूंत दूध उत्पादनात वाढ होते. याउलट उन्हाळ्यात मात्र या दोन्ही बाबींचा थेट दूध उत्पादनावर परिणाम होत असतो.’’

पुणे जिल्ह्यात सरासरी प्रतिदिन २० लाख लिटर दूध उत्पादन होत असते. सद्यःस्थितीत त्यात सुमारे चार लाख लिटरने घट झाली आहे. त्यामुळेच सध्या दूध पावडरला मागणी वाढली आहे. परिणामी, पावडरच्या दरातही वाढ झाली असल्याचे  मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

दरवर्षी उन्हाळ्यात सरासरी १५ ते २० टक्के दूध उत्पादनात घट होत असते. शेतकऱ्यांनाही हे माहीत असते. त्यामुळे शेतकरी भर उन्हाळ्यातही दूध उत्पादन घटू नये, यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यामुळे जिल्ह्यात तरी दूध उत्पादन घटीचा परिणाम फारसा जाणवत नाही. 
- प्रकाश कुतवळ, सचिव,  महाराष्ट्र राज्य दूध प्रक्रियाधारक व उत्पादक कल्याणकारी संघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT