नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी 
महाराष्ट्र

केंद्र-राज्य भेदभाव न करता मदत द्या, शिवसेनेची मोदींकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

गेल्या आठवड्यात आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला होता. या मुसळधार पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जायबंदी झालं होतं. येथील पूरस्थिती ओसरल्यानंतर नेतेमंडळींचे पाहणी दौऱे सरु झाले आहेत. मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते, उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांसह अनेक नेत्यांनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यावेळी नेतेमंडळींनी मदतकार्याचा आढावा घेतला. पंचनामे झाल्यानंतर मदत जाहीर करण्यात येणार, असल्याचं राज्याकडून सांगण्यात आलं. केंद्राकडून मिळालेली मदत तटपुंजी असल्याचाही आरोप राज्याकडून करण्यात आला आहे. राज्यातील मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींना मदतीचं आवाहन केलं आहे. मोठा भाऊ म्हणून आता केंद्राने जबाबदारी घ्यायला हवी. केंद्राने दिलेली मदत तुटपुंजी असून, केंद्र आणि राज्य भेदभाव न करता भरीव मदत द्या, असे आवाहन नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते एका वृत्तवाहिनीला बोलत होते.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेकांच्या डोक्यावरील छत नाहिसं झालं. तर पूरस्थिती ओसरल्यानंतर रोगराई पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूरस्थिती ओसरल्यानंतर रोगराई पसरण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कँम्प राबवले जातायत. राज्य सरकारने पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. पंचनामे झाल्यावर दोन दिवसात पॅकेज जाहीर केले जाईल. पॅकेज जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हटले यांनी म्हटले आहे.

पॅकेज देणारा नव्हे, मदत करणारा मुख्यमंत्री - ठाकरे

मी पॅकेज देणारा नव्हे तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे या अस्मानी संकटात कोणत्याही घोषणा करणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागातील दौऱ्यावर असताना स्पष्ट केलं. पूरस्थिती हळूहळू ओसरत आहे, त्यामुळे नुकसानीचा नेमका अंदाज आलेला नाही, त्यामुळे आताच मदतीची घोषणा करणार नाही. तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारुचे व्यसन अन् ED मागे लागलेल्या नेत्याला निवडून देऊ नका; अण्णा हजारेंचा केजरीवालांवर बोचरा वार

Pune Crime News : बायकोचा दिवाना! पत्नी नांदायला आली नाही तर पुण्यात सात ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी

Panchayat 3: 'पंचायत'मधील फुलेरा गावाच्या सचिव पदाची पोस्ट रिक्त, नीना गुप्तांनी मागवले अर्ज, पोस्ट चर्चेत

KKR: 'माहीभाईचं घर दिसतंय का?' रांचीवरून विमान जात असताना उत्साही वेंकटेश अय्यरचा प्रश्न, Video होतोय व्हायरल

Fashion Designing Course : परदेशात जाऊन शिकायचंय Fashion Designing? तर या आहेत बेस्ट युनिव्हर्सिटीज

SCROLL FOR NEXT