Fashion Designing Course : परदेशात जाऊन शिकायचंय Fashion Designing? तर या आहेत बेस्ट युनिव्हर्सिटीज

या कॉलेजेसमध्ये शिकण्यासाठी साधारण खर्च किती येईल?
Fashion Designing Course
Fashion Designing Courseesakal

Fashion Designing Course :

जगभरात शिक्षणाच्या पद्धती, करिअर ओरिएंटेड कोर्स करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे, किरकोळ समजले जाणारे क्षेत्रही आजकाल मोठे बनले आहे. पुर्वी गल्लीत एखादी महिला ब्लाऊज शिवण्याचे क्लासेस घ्यायची. पण आता फॅशन डिझाईनिंगचे क्षेत्राचे जाळे जगभर पसरले आहे.

आजकाल केवळ ब्लाऊज नाहीतर, कापडासापून बनवलेले कपडे, शूज, पर्स, आणि कापडावर केलेली कलाकुसर, त्याला दिलेला Customize टच  याचाही समावेश यात होतो. फॅशन जगताची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळेच या क्षेत्रात काम करण्याची इच्छा मुलीच नाहीतर अनेक मुलांच्याही मना निर्माण होत आहे. (Fashion Designing Course)

Fashion Designing Course
Career In Fashion Designing : फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करायचे आहे? मग, जाणून घ्या 'या' कामाच्या संधी

जर तुमच्या घरातही कोणी या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक असेल. तर, त्यासाठी परदेशातील काही विद्यापीठे, शिक्षण संस्था चांगला पर्याय ठरू शकतात. कारण, परदेशात जाऊन घेतलेलं शिक्षण त्यांच्या नोकरीसाठीही फायद्याचे ठरेल.

आज आपण परदेशातील Fashion Designing शिकवणाऱ्या संस्थांची माहिती घेणार आहोत. जिथे तुम्हाला पुस्तकी ज्ञानाच्या बाहेर पडून काहीतरी नवे शिकायला मिळेल.

Fashion Designing Course
Weapon : स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगणे म्हणजे एक फॅशन होतेय का?
Fashion Designing Course
Met Gala 2024 : Met Gala कसा बनला फॅशन जगतातला ऑस्कर ? जाणून घ्या यंदाची थीम अन् इतिहास

मॅंचेस्टर विद्यापीठ

फॅशन डिझाईनिंग शिकवणाऱ्या जगातील पहिल्या पाच  विद्यापीठांमध्ये मॅंचेस्टर विद्यापीठाचा समावेश होतो. इंग्लंडमध्ये असणाऱ्या या विद्यापीठात मास्टर ऑफ सायन्स (एमएससी), इंटरनॅशनल फॅशन मार्केटिंग, बॅचलर ऑफ सायन्स इन फॅशन टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ सायन्स इन फॅशन मार्केटिंग आणि बॅचलर ऑफ सायन्स इन फॅशन यांसारखे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्याच्या फीबद्दल बोलायचे झाले तर, येथील वार्षिक फी सुमारे 32 लाख 62 हजार इतकी रुपये आहे.

हाँगकाँग विद्यापीठ

द हाँगकाँग पॉलिटेक्निक विद्यापीठात फॅशन आणि टेक्सटाइल इंडस्ट्रीमधील बॅचलर ऑफ आर्ट्स सारखे अनेक अभ्यासक्रम शिकवले जातात. या विद्यापीठाची वार्षिक फी सुमारे 33 लाख आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी सिडनी

तुम्ही ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी सिडनीमधून फॅशन कोर्स करू शकता. इथे बॅचलर ऑफ डिझाईन, बॅचलर ऑफ आर्ट्स इन फॅशन अँड टेक्सटाइल, बॅचलर ऑफ क्रिएटिव्ह इंटेलिजन्स अँड इनोव्हेशन, इंटरनॅशनल स्टडीज आणि बॅचलर ऑफ डिझाईन (फॅशन आणि टेक्सटाइल) सारखे अभ्यासक्रम देतात. येथील वार्षिक फी 12.36 लाख रुपये आहे.

Fashion Designing Course
Fashion Trends: स्मार्टफोनमुळे रुजतोय स्वतःचे फॅशन स्टेटमेंट करण्याचा ट्रेंड!

कॉर्नल विद्यापीठ, इथाका

युनायटेड स्टेट्समध्ये स्थित कॉर्नेल विद्यापीठ देखील फॅशन डिझायनिंगचा कोर्स करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. यात बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन मॅनेजमेंट आणि बॅचलर ऑफ आर्ट्स फॅशन डिझाईन असे दोन प्रमुख अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या विद्यापीठाचे वार्षिक शुल्क सुमारे 54.43 लाख रुपये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com