महाराष्ट्र

आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार महाराजांच्या वेषात ! (व्हिडीओ)

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- मराठा, धनगर मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेष परिधान करुन सरकारचे लक्ष वेधून आंदोलन केले. त्यांच्या आरक्षणाच्या या वेगळया आंदोलनाचीच आज विधानभवनात चर्चा सुरु होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश गजभिये हे नेहमी सरकारविरोधात वेगवेगळी आंदोलने करत असतात. याअगोदर त्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये भीमा कोरेगाव दंगलीतील संशयित आरोपी संभाजी भिडे यांचा वेष परिधान करुन त्यांच्या मुल होणाऱ्या आंब्याची विक्री करत लक्ष वेधले होते. त्यानंतर त्यांनी संत तुकारामांचा वेष परिधान करुन आंदोलनामध्ये धार आणली होती आणि आता हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण आणि इतर विषयासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांचा वेष परिधान करुन ‘देताय की जाताय’ असं म्हणत सरकारचे लक्ष वेधले.



मराठा, धनगर, मुस्लिम या समाजाला तात्काळ आरक्षण द्या शिवाय जाहीर केलेली सरसकट कर्जमाफी कधी देणार आणि छत्रपती व बाबासाहेबांचे स्मारक कधी बांधणार असे प्रश्न उपस्थित करत आमदार प्रकाश गजभिये यांनी सरकारला ही आश्वासने पूर्ण करता येत नसतील किंवा देता येत नसतील तर 2019 मध्ये चालते व्हा असा इशाराही आमदार गजभिये यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT