MLA Santosh Bangar Viral Video  
महाराष्ट्र बातम्या

Viral Video : तुमचे आई-वडील मला मतदान करणार नसतील तर... ; संतोष बांगर यांची शाळकरी मुलांकडे अजब मागणी

MLA Santosh Bangar Viral Video : सत्ताधारी पक्ष शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात..

रोहित कणसे

MLA Santosh Bangar Viral Video : सत्ताधारी पक्ष शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. आता आमदार बांगर यांचा एका शाळेतील व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत बांगर हे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना एक अजब सल्ला देताना दिसत आहेत.

आमदार बांगर हे या व्हिडीओत आई-वडील जर संतोष बांगरला मतदान करणार नसतील तर तुम्ही दोन दिवस उपाशी राहा असे सांगताना पाहायला मिळत आहे. बांगर त्यांच्या मतदारसंघातील लाख या गावाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी या शाळेत भेट दिली, तेव्हा विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना हा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले.

पप्पा म्हणत असतील की दुसरीकडे मतदान करायचं तर दोन दिवस जेवायचं नाही आणि आई-वडीलांनी विचारलं की का जेवायचं नाही? तर सांगायचं की आमदार संतोष बांगरला मतदान करा मगच जेवणार असं सांगायचं असे बांगर विद्यार्थ्यांना सांगताना दिसत आहेत. शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा चिमुकल्या विद्यार्थ्यासोबतच्या या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघातील आमदार संतोष बांगर हे शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देखील आहेत. दरम्यान बांगर सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने चर्चेत राहतात.

शिवसेनेतील फुट पडली तेव्हा बांगर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र उद्धव ठाकरेंचं सरकार पडल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. शिवीगाळ, मारहाण अशा वेगवेगळ्या प्रकरणात नाव आल्याने बांगर नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी पंतप्रधान झाले नाहीत तर भरचौकात फाशी घेईल, असं चॅलेंज देखील त्यांनी दिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Kale Murder Case: सोशल मीडियात गणेश काळेच्या हत्येचं समर्थन; बंदुकांसह काडतुसे सोबत ठेवून फोटो

Latest Marathi News Live Update : अतिवृष्टी पाहणीसाठी केंद्रीय पथक राज्यात

Mumbai: धक्कादायक! मुंबई कोर्टातच महिला वकिलाला हृदयविकाराचा झटका, लोक सीपीआर देण्याऐवजी व्हिडिओ काढण्यात व्यस्त, दुर्दैवी मृत्यू

Pune Police: पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? मद्यपींकडून पोलिसांनाच धक्काबुक्की

Air India Flight: दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक बिघाड; मंगोलियात इमर्जन्सी लँडिंग

SCROLL FOR NEXT