trupti-sawant
trupti-sawant 
महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : बंडखोर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वांद्रे पूर्व मतदारसंघातील विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी कायम ठेवल्याने शिवसेनेला ताेटा हाेऊ  शकताे याच कारणास्तव पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे.

विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान अवघ्या 2 दिवसांवर आलं असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यभरातील बंडखोरी शमविण्यात शिवसेना- भाजपाला काही प्रमाणात यश आलं असलं तरी अद्यापही काही जागांवर बंडखोरी कायम आहे. त्याचे नुकसान भाजप-सेनेला हाेण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी कायम ठेवत उमेदवारी मागे घेतली नाही. याच कारणास्तव बंडखोर तृप्ती सावतं यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पक्षाच्या विरोधातील भूमिकेमुळे ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तृप्ती सावंत यांनी वांद्रे पूर्वमधून बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तृप्ती यांच्या अशा वागण्यामुळे त्यांची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

मुंबईच्या वांद्रे पूर्व विभागातून तृप्ती सावंत यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचं सामानाच्या मुखपत्रातून जाहीर करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून तृप्ती यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सामनात म्हटलं आहे. दरम्यान, तृप्ती सावंत यांचं तिकीट नाकारून महायुतीच्या विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तृप्ती सावंत यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि निकटवर्तीयांमध्ये नाराजीचा सूर होता. तृप्ती सावंत या दिवंगत बाळा सावंत यांच्या पत्नी असून, त्या आमदार आहेत. 2015 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये तृप्ती यांनी ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता. पण यंदा त्यांना उमेदवारी नाकरण्यात आली. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला असल्याची त्यांची भावना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT