MLC Election 2022
MLC Election 2022  Sakal
महाराष्ट्र

MLC Election 2022: धाकधूक वाढली, सर्व पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरूच

दत्ता लवांडे

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुका एका दिवसावर येऊन ठेपल्या असून सर्वच राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे. विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणुका होत असून महाविकास आघाडीचे सहा तर भाजपच्या पाच उमेदवार रिंगणात आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. दरम्यान मविआच्या उमेदवारांचा कोटा उद्या मुख्यमंत्री ठरवणार असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान सर्व आमदारांना मतदान प्रक्रिया समजावून सांगण्यात येत असून सर्वजण मतांची जुळवाजुळव करताना दिसत आहेत.

(MLC Election 2022 Updates)

विधानपरिषदेची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होणार असून यावेळी आमदार फुटण्याची शक्यता जास्त असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी आपापल्या आमदारांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले आहे. सर्वांनीच खबरदारी घेतली असून उद्या सर्व पक्षांच्या आमदारांची पुन्हा बैठक घेतली जाणार आहे.

राज्यसभेतील झालेल्या दगाफटका विधानपरिषदेला होऊ नये यासाठी मविआकडून सावध पवित्रा घेण्यात आला आहे. त्यातून गुप्त मतदान पद्धती असल्याने एका उमेदवाराला किती आमदारांनी मत द्यायचे हे मुख्यमंत्री शेवटच्या क्षणाला ठरवणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी मविआची रणनीती बदलण्याची शक्यता आहे. "दुध पोळलं तर ताक पण फुकून पितो." असं अजित पवार म्हणाले आहेत. "सध्या आपापल्या पद्धतीने तयारी करावी शेवटच्या क्षणी मी आदेश देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे." असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान भाजपही आपल्या मतांचे गणित जुळवताना पाहायला मिळत आहे. त्यांनी आपल्या सर्व आमदारांना जमा केलं असून मतांच्या आकडेवारीमध्ये गुंग असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. तर सर्व पक्षांच्या आमदारांच्या बैठकांना जोर आलाय. भाजपच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक आजारी असताना मतदानासाठी हजर असणार आहेत. तसेच राज्यसभेच्या मतदानासाठी अॅम्बुलन्समधून आलेले चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून देवेंद्र फडणवीस निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे.

भाजपचे चंद्रकांत पाटलांनी आम्ही पाचही जागांवर विजय मिळवणार असून महाविकास आघाडीची एक विकेट पडणार आहे असा दावा केला आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमच्या आमदारांवर ईडीचा दबाव टाकला जात आहे असा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर अपक्ष पण भाजपाला जाहीर पाठिंबा असणारे आमदार रवी राणा यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलंय. मतदानाच्या तोंडावर घडत असलेल्या या घटनेमुळे सर्व पक्षांची आणि नेत्यांची धाकधूक वाढली असून सर्वांचे बैठकीचे सत्र सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला; फुलांचा हार घालायला आला अन्...; व्हिडिओ व्हायरल

MI vs LSG Live Score IPL 2024 : केएलच्या संथ फलंदाजीवर निकोलसचा आक्रमक उतारा; मुंबईसमोर ठेवलं 215 धावांचे आव्हान

Uddhav Thackeray: "4 जूननंतर देश डि'मोदी'नेशन करणार, शिवाजी पार्कवर शेवटचं..."; ठाकरेंचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: मोदीजी हिंमत असेल तर संपवण्याचा प्रयत्न करुन बघा...; उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

Latest Marathi News Live Update: मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड?

SCROLL FOR NEXT