क्षेपणास्त्राची माहिती पाकिस्ताला दिली; DRDOच्या अभियंत्याला अटक

पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवल्याप्रकरणी संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (DRDL)च्या एका अभियंत्याला बेड्या ठोकल्या आहेत.
Arrest
ArrestSakal

हैद्राबाद : पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवल्याप्रकरणी संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (DRDL)च्या एका अभियंत्याला बेड्या ठोकल्या आहेत. भारताच्या क्षेपणास्त्र विकास प्रकल्पाचे काही फोटो पाकिस्तानी गुप्तहेराला पाठवल्याप्रकरणी अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. युकेमधील संरक्षण जर्नलमध्ये काम करत असलेल्या एका महिलेला फोटो पाठवल्याप्रकरणी शुक्रवारी अभियंत्याला अटक केल्याचं तेलंगणा पोलिसांनी सांगितलं आहे.

Arrest
Fathers Day: आपल्या आईवडिलांना द्या असंही अनोखं 'गिफ्ट'

दुक्का मल्लिकार्जुन रेड्डी असं या आरोपीचं नाव आहे. हा आरोपी विशाखापट्टणम येथील रहिवाशी असून तो सध्या DRDO च्या प्रयोगशाळेत अभियंता म्हणून काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तो DRDL च्या Advance Naval System Programme मध्ये कंत्राटी पद्धतीवर गुणवत्ता चेकिंग अभियंता म्हणून काम करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. बालापूरमधील रिसर्च सेंटर इमारतमध्ये तो कार्यरत होता.

रचकोंडा पोलिस आणि बाळापूर पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 409 आणि ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट, 1923 च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाईल फोन, एक सिम कार्ड आणि एक लॅपटॉप जप्त केला.

Arrest
MLC Election 2022: मविआची एक विकेट पडणार; चंद्रकांत पाटलांचा दावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खासगी कंपनीत दोन वर्षे काम केल्यानंतर त्याने DRDL चा हा प्रोजेक्ट डॉईन केला होता. २०२० मध्ये तो या प्रकल्पात काम करण्यासाठी रूजू झाला होता. त्याने त्याच्या फेसबुक प्रोफाईलमध्ये तो DRDL मध्ये काम करत असल्याचं मेंशन केलं आहे. तो फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या हनीट्रॅमध्ये अडकला आणि दररोज त्यांच्या संपर्कात राहत होता. आणि त्यांना भारत संरक्षण आणि संशोधन प्रकल्पाचे फोटो पाठवत असे. मिसाईल विकास प्रकल्पाचे कागदपत्र आणि फोटो नताशा राव, अका सिमरन चोप्रा, ओमिशा अड्डी यांना पाठवले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com