raj thackeray
raj thackeray 
महाराष्ट्र

#RajStrike : राष्ट्रभक्ती आम्हाला शिकवणारे नरेंद्र मोदी कोण?: राज ठाकरे

सकाळवृत्तसेवा

मुंबईः राष्ट्रभक्ती आम्हाला शिकवणारे नरेंद्र मोदी आहेत कोण? जर तुम्ही स्वतःला देशभक्त म्हणवता तर हवेतल्या हवेत विमान फिरवून नवाज शरीफ यांना भेटायला, त्यांच्या वाढदिवशी त्यांना केक भरवायला का गेलात? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) विचारला. मनसेच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या मुलाची कंपनी आहे, त्यात दोन पार्टनर आहेत. एक अरब आणि दुसरा पाकिस्तानी. भाजपला हे चालते इतर कोणी असता तर त्याला राष्ट्रद्रोही किंवा देशद्रोही ठरवले असते. राष्ट्रभक्ती आपल्याला शिकवणारे नरेंद्र मोदी कोण आहेत?

अजित डोवलबाबत बोलायची राज ठाकरेंची लायकी आहे का? असे म्हणत मला ट्रोल केले. मला काही माहिती आहे का नाही? मला निश्चितच माहिती आहे म्हणूनच मी बोललो. मी फक्त एवढंच म्हटले होते की, अजित डोवल यांची चौकशी करा अनेक गोष्टी समोर येतील. त्यावरून मला ट्रोल करण्यात आले. पण, मला त्याची काहीही पर्वा नाही.

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्देः

  • मोदी भक्तीने आंधळे झालेले कधी सुधारणार नाहीत
  • देशातील पत्रकारीतेला धोक्याचे दिवस असून, चांगल्या पत्रकारांना टार्गेट केले जाते
  • मुद्याला मुद्याने उत्तर न दिल्यास, शिव्या दिल्यास घरातून बाहेर काढून मारा
  • सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा कुठून बनून आला?
  • प्रत्येक निवडणूकीच्या आधी दहशतवादी हल्ला होतो
  • 25 डिसेंबरला 2015 नवाज शरिफांना केक भरवला पुढीलसात दिवसात पठाणकोट येथे भारतीय लष्करावर हल्ला झाला
  • राफेल प्रकरणात 'राम' आणि 'हिंदू' अंगावर आले
  • राफेलचे पेपर चोरीला गेल्याचा बनाव केला जातोय
  • निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा पुलवामा सारखा हल्ला घडविला जाईल
  • मोदींच्या भाषणाचे अनेक व्हिडीओ दाखवून मोदींवर टीका
  • विमानाची किंमत साडेपाचशेवरून सोळाशेकोटी कसी होते
  • प्रश्न राफेल विमानाच नाही, याच कंत्राट अंबानींना कस दिल हा प्रश्न आहे
  • भष्ट्राचार लपविण्यासाठी राफेलच नाव घेत आहेत
  • निवडणूकीसाठी सैन्याचा वापर होतोय
  • वैमानीक बॉम्ब टाकायला चुकले नाहीत, त्यांना माहितीच चुकीची दिली
  • एअर स्ट्राईकनंतर भाजपच्या काही पोर्टलवर खोट्या बातम्या पसरवल्या
  • एअर स्ट्राईक नंतरचे मोदींचे हसरे फोटो
  • मोदी कसले फकीर हे तर बेफिकीर
  • पुलवामा हल्ल्यानंतर रोज मोदींचे नवनवीन कपडे घातलेले फोटो आलेत
  • गुप्तचर यंत्रणेने सांगून देखील काळजी घेतली नाही मग राष्ट्रीय सल्लागर काय करत असतो
  • पुलवामा हल्ला हा गुप्तचर विभागाचे अपयश नाही
  • गुप्तचर यंत्रणेने सांगून देखील काळजी घेतली नाही, मग प्रश्न कुणाला विचारायचे
  • हवेत विमान फिरवून नवाज शरीफांना केक भरविण्यासाठी मोदी का गेले?
  • भाजप व नरेंद्र मोदी तुम्ही आम्हाला राष्ट्रभक्ती शिकविणारे कोण
  • 29 डिसेंबर ला अजित डोवल आणि पाकिस्तानेचे सुरक्षा सल्लागार यांची 27 डिसेंबरला गुप्त बैठक झाली
  • अजित डोवल यांच्या मुलाच्या कंपनीचा एक पार्टनर अरब आणि दुसरा पाकिस्तानी आहे
  • मनसेच्या वर्धापनदिनिमित्त राज ठाकरेंच भाषण. कुठल्याही प्रकारच्या ट्रोलला मी भीक घालत नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT