Raj Thackeray
Raj Thackeray 
महाराष्ट्र

राज ठाकरेंची काँग्रेसच्या चाणक्याशी भेट; मनसे महाआघाडीत?

वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या विवाहसोहळ्यात काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल यांनी लावलेली हजेरी सर्वांचा चर्चेचा विषय बनला आहे. राज ठाकरे आणि अहमद पटेल यांच्यात 20 मिनिटे चर्चा झाल्याने महाआघाडीत मनसे सहभागी होणार का, याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

भाजपच्या पराभवासाठी काँग्रेसने विविध राज्यांत प्रादेशिक पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार राज ठाकरे यांनी अहमद पटेल यांची खासगीत भेट घेतली. राज ठाकरे यांनी लग्नानिमित्त आलेल्या निमंत्रणामुळे अहमद पटेल हजर होते. राज ठाकरे आणि अहमद पटेल यांच्यात 20 मिनिटे खासगीत बैठक झाल्याचे वृत्त असून या बैठकीनंतर राज ठाकरे देखील महाआघाडीत सामील होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

अमित ठाकरे यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. या विवाहसोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. राज ठाकरेंनी या विवाहसोहळ्यासाठी राहुल गांधी यांना देखील निमंत्रण दिले होते. या विवाहसोहळ्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या वतीने अहमद पटेल हे सहभागी झाले होते. अहमद पटेल हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांची काँग्रेसचे चाणक्य म्हणूनही ओळख आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेला दोन ते तीन जागा देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी आहे, अशीही चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT