Modi and cabinet silence on fuel hike says Congress party
Modi and cabinet silence on fuel hike says Congress party 
महाराष्ट्र

इंधन दरवाढीवर मोदी आणि मंत्रिमंडळाची चुप्पी - काँग्रेस

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली- इंधन दरवाढीच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने चुप्पी साधलेली आहे. या मुद्यावर पूर्ण केंद्र सरकारच मौनी बाबा झाल्याचा आरोप आज काँग्रेसकडून पत्रकार परिषदेदरम्यान करण्यात आला. 11 लाख कोटी रुपयांचा कर जमा करुन देखील मोदी सरकारने इंधन दरवाढीसाठी आंतरराष्ट्रीय कारण असल्याचे सांगणे हे चुकीचे असल्याचेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती 40 टक्यांनी कमी होऊन देखील इंधन दरवाढ होत आहे. त्याचबरोर, 11 लाख कोटी रुपयांचा करही वसूल करण्यात आला आहे, मग हा पैसा कोणाच्या खिशात जातो असा प्रश्नही यावेळी काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदीजी 29 देशात 37 रुपये प्रति लीटर प्रमाणे आपल्या देशातून इंधन विक्री करत असाताना आपल्याच देशातील जनतेला एवढे इंधन महाग देण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

छत्तीसगढमध्ये पेट्रोलवर 26.90 टक्केल वॅट आहे, गुजरातमध्ये 25.5 टक्के तर महाराष्ट्रात 39.12 टक्के वॅट आहे, जिथे जिथे भाजपचे सरकार आहे, तिथे तिथे इंधनावर मोठ्या प्रमाणात कर आकारण्यात आला आहे. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे कर आकारण्यात येत आहेत. हे काही आंतरराष्ट्रीय कारणांमुळे झालेले नाही. राजस्थामध्ये सरकार पडणार आहे याचा अंदाज आल्याबरोबर तिथे 4 टक्यांनी इंधनावरील कर कमी करण्यात आला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

रुपयाची किंमत सातत्याने ढासळत चालली आहे, आज रुपयाची किंमत 72 रुपये 67 पैसे एवढी झाली आहे. याला कुठलेही आंतरराष्ट्रीय कारण नसून 'मोदीनॉमिक्स'चे हे फेल्योर आहे, असेही यावेळी सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT