Monsoon Update
Monsoon Update sakal
महाराष्ट्र

monsoon Update : मॉन्सूनबाबत मोठी अपडेट! 'या' कालावधीत धडकणार विदर्भात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून यंदा निर्धारित वेळेत अंदमानमध्ये दाखल झाला असून, पुढील आठवड्यात केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा प्रवास याच गतीने पुढेही कायम राहिल्यास, मॉन्सून १५ ते २० जूनच्या दरम्यान विदर्भात धडकण्याची दाट शक्यता आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सूनने गेल्या १९ मे रोजी अंदमान व निकोबार बेटात प्रवेश केला असून, केरळच्या दिशेने आगेकूच सुरू झाली आहे. मॉन्सूनची प्रगती पुढेही अशीच कायम राहिल्यास येत्या चार जूनपर्यंत केरळमध्ये आगमन अपेक्षित आहे. त्यानंतर मॉन्सून कोकणमार्गे महाराष्ट्राच्या सीमेत दाखल होणार आहे.

साधारणपणे केरळमधून विदर्भात यायला किमान दोन आठवड्यांचा अवधी लागतो. प्रवासात कसलाही अडथळा न आल्यास येत्या १५ ते २० जूनच्या दरम्यान विदर्भात मॉन्सून दाखल होण्याची दाट शक्यता आहे. तथापि मध्येच कमजोर पडल्यास थोडा उशीरही होऊ शकतो, असे प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

विदर्भाच्या मॉन्सूनच्या गेल्या दशकातील इतिहासावर नजर टाकल्यास तीन-चार वर्षांचा अपवाद वगळता मॉन्सूनचे वेळेत आगमन झाले आहे. दरवर्षीप्रमाणे मॉन्सूनच्या अगोदर विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

मॉन्सूनवर विपरित परिणाम नाही

एप्रिल व मे महिन्यात बरसलेल्या अवकाळी पावसाचा आगामी मॉन्सूनवर विपरित परिणाम होणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र यंदाच्या पावसाळ्यावर 'एल निनो'चा थोडाफार प्रभाव पडू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. हवामान विभागाने यावर्षी ९६ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे, जो गतवर्षीच्या तुलनेत किंचित कमी आहे. यंदाचा मॉन्सून प्रत्यक्षात कसा व किती राहील, यासंदर्भात लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे, गतवर्षी विदर्भात २०१३ नंतर सर्वाधिक १२२७ मिलिमीटर पाऊस पडला होता.

विदर्भात दशकातील मॉन्सूनचे आगमन व पडलेला पाऊस

वर्ष तारीख एकूण पाऊस

२०२२ १६ जून १२२७ मिमी

२०२१ ९ जून ९६८ मिमी

२०२० १२ जून ८५२ मिमी

२०१९ २२ जून १०५४ मिमी

२०१८ ८ जून ८७५ मिमी

२०१७ १६ जून ७३१ मिमी

२०१६ १८ जून १०४५ मिमी

२०१५ १३ जून ८४८ मिमी

२०१४ १९ जून ८१७ मिमी

२०१३ ९ जून १३६० मिमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT