Monsoon Update  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Update : मॉन्सूनची स्वारी आज महाराष्ट्रात येण्याचे संकेत

राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, सांगली, सोलापूरसह राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाने तडाखा दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Monsoon Update : ‘मॉन्सून’चे महाराष्ट्रातील आगमन काही तासांवर येऊन ठेपले आहे. गोव्यात दाखल होत मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. उद्या (ता. ६) मोसमी वारे तळकोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, धाराशिव जिल्ह्यांत दाखल होण्याची शक्यता आहे.

तर १० जूनपर्यंत विदर्भाचा काही भाग वगळता बहुतांश महाराष्ट्रात मॉन्सूनची प्रगती होण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले. राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.

पुणे, सांगली, सोलापूरसह राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाने तडाखा दिला आहे. नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे. महाराष्ट्रावर पूर्वमोसमी पावसाच्या ढगांची छाया कायम आहे. आज (ता. ६) राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने वर्तविला.

पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाश यामुळे कमाल तापमान कमी होत आहे. बुधवारी (ता.४) पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, धाराशिव, अमरावती,

बुलडाणा, वर्धा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. कर्नाटक किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यातच पश्चिमेकडील वाऱ्यांचे प्रवाह बळकट होत असून, अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा वाढला आहे.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

  • कोकण : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

  • मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

  • मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, हिंगोली.

  • विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC: टेबलपासून खुर्चीपर्यंत सगळं भगवा! बीएमसीत बदलाची नांदी; दोन दशकांनंतर सत्तेचा रंग बदलला

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय! नियम, मार्गदर्शन आणि प्रेरणा एकाच ठिकाणी मिळणार; पण कसं? जाणून घ्या...

महाराजांचे सिनेमे करतो मग... अमेय खोपकरांच्या आरोपांवर अखेर दिग्पाल लांजेकरांनी उत्तर दिलंच; म्हणाले-

'त्या घटनेमुळे मला त्यांची भिती वाटते' चिन्मय मांडलेकरला अशोक सराफ यांच्याकडून मिळालेला धडा, म्हणाला, 'आजही त्या गोष्टीची मनात...'

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्हा कचेरीवर सकल मातंग समाजाचा आक्रमक मोर्चा

SCROLL FOR NEXT