महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांची 24 दिवसांचे वेतन कपात?

तेजस वाघमारे

मुंबई - ऐन दिवाळीमध्ये एसटी कर्मचारी तीन दिवस संपावर गेल्याने एसटी महामंडळाला सुमारे सव्वाशे कोटींचा तोटा सहन करावा लागला. तो भरून काढण्यासाठी महामंडळ संपात सहभागी झालेल्या कामगारांवर कठोर कारवाई करण्याचा विचार करत आहे. विशेष म्हणजे महामंडळाच्या परिपत्रकानुसार संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 24 दिवसांची वेतन कपात होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. महामंडळाच्या संचालक मंडळाच्या सोमवारी (ता. 23) होणाऱ्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार असल्याचे, महामंडळातील सूत्रांनी सांगितले.

एसटी महामंडळाच्या परिपत्रकानुसार एक दिवसाचा संप केल्यास संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आठ दिवसांचे वेतन कपात करण्याचा नियम आहे. विविध मागण्यांसाठी महामंडळातील काही कर्मचारी 2015 मध्ये एक दिवसाच्या संपावर गेले होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे आठ दिवसांचे वेतन कपण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र, कर्मचाऱ्यांनी त्याला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची आठ दिवसांची वेतन कपात झाले नव्हती.

एसटी महामंडळाचे 99 टक्के कर्मचारी 16 ऑक्‍टोबरच्या मध्यरात्रीपासून संपावर गेले. तीन दिवसांच्या संपामुळे ऐन दिवाळीमध्ये राज्यभरातील प्रवाशांचे हाल झाले. यासह महामंडळाला दिवाळीच्या कालावधीत मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नावरही पाणी सोडावे लागले.

महामंडळाला दरदिवशी सुमारे 18 ते 22 कोटींचे उत्पन्न मिळते. वार्षिक उत्पन्न सात हजार 56 कोटी आहे. तर खर्च सात हजार 584 कोटी आहे. यातील तीन हजार 157 कोटी रूपये वेतनावर खर्च होतात. तर उर्वरित दोन हजार 968 डिझेल आणि 931 कोटी रुपये इतर बाबींवर खर्च होतात. यामुळे महामंडळाला 528 कोटींची वार्षिक तूट सहन करावी लागत आहे. दिवाळीच्या कालावधीत मिळणारे 125 कोटींचे उत्पन्न बुडाल्याने ही तूट भरून काढण्यासाठी संबंधीत परिपत्रकानुसार कारवाई करण्याचा विचार महामंडळ करत आहे. महामंडळाच्या संचालक मंडळाच्या सोमवारी (ता. 23) बैठक होत असून, त्या वेळी या विषयावर चर्चा होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौची सामन्यावर पकड, स्टॉयनिस अन् दीपक हुड्डा लढवला किल्ला

SCROLL FOR NEXT