महाराष्ट्र

उमेदवारीचे पत्ते गुलदस्तातच

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत अर्ज भरण्याची मुदत संपण्यास अवघे काही तास उरले असताना भाजप आणि कॉंग्रेस पक्षाने "थांबा आणि पाहा'ची भूमिका घेत अजूनही आपले उमेदवार निश्‍चित केले नाहीत. कॉंग्रेस पक्षाने बैठकीचा जोर लावला असून, भाजप रात्री उशिरा बैठक घेऊन उमेदवाराच्या नावावर चर्चा करणार आहे. कॉंग्रेस आणि भाजप एकमेकांची रणनीती पाहून अखेरच्या क्षणी उमेदवार देण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, शिवसेनेही आपला पत्ता अद्याप उघड केला नाही. त्याचबरोबरच नारायण राणे हेसुद्धा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असल्यामुळे सर्व राजकीय पक्षांत डावपेचाबाबतचा "सस्पेंस' कायम आहे. यामुळे उमेदवारांची नावे रात्री उशिरा अथवा उद्या (सोमवारी) सकाळी घोषित होण्याची शक्‍यता आहे.

माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांनी राजीनामा दिल्याने विधान परिषदेच्या एका जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या (सोमवारी) दुपारी तीन वाजता संपत आहे. तरीही कोणत्याच पक्षाने उमेदवार निश्‍चित केला नाही.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मुंबईत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपसभापती माणिकराव ठाकरे आणि नसीम खान यांच्या सोबत बैठक घेतली. या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार दिलीप माने यांच्या नावावर चर्चा झाली.

मात्र त्यावर शिक्‍कामोर्तब झाले नाही. अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या संपर्कात राज्य कॉंग्रेसचे नेते आहेत. हे नेते भाजपचा उमेदवार पाहूनच पुढील भूमिका घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

कॉंग्रेसच्या गोटात हे वातावरण असताना भाजपमध्ये अद्याप कोणतीच हालचाल नाही. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाशिक येथे बोलताना म्हटले आहे, की भाजपमध्ये अनेक जण इच्छुक आहेत. भाजपचे मुख्य प्रवक्‍ते माधव भंडारी, प्रवक्‍ते केशव उपाध्ये, प्रदेश भाजपच्या कोशाध्यक्ष शायना एन. सी यांची नावे चर्चेत आहेत. आज रात्री मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक घेऊन उमेदवारांच्या नावावर चर्चा करणार आहे. असे असले तरी आर्थिक ताकद असलेले प्रसाद लाड यांची दावेदारी प्रबळ असल्याचे सूत्रांकडून समजते.

त्यातच दोन दिवसांपूर्वी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे हे पाठिंबा मागण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. ठाकरे यांनी भाजपाचा उमेदवार कोण आहे. यावरून पाठिंबा देण्याचे दोन दिवसांत कळवले जाईल, असे सांगितल्यामुळे भाजपचा उमेदवार जाहीर होण्यास विलंब लागत आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जर कॉंग्रेस पक्षाचा उमेदवार असेल तर कॉंग्रेस पक्षाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सर्व पक्षांत बैठकांना जोर आला असला, तरी उमेदवार मात्र निश्‍चित होत नाही.

कोणाची काय भूमिका
कॉंग्रेस - भाजपचा उमेदवार कोण आहे, हे पाहून उमेदवार देण्याचा निर्णय. दिलीप माने यांच्या नावाची चर्चा
भाजप - शिवसेनेच्या पाठिंब्याबद्दल अनिश्‍चितता असल्याने वेळ. सोमवारी उमेदवार घोषित करण्याची शक्‍यता
शिवसेना - नारायण राणेंना विरोध; भाजपच्या उमेदवाराचे नाव समजल्यावर पाठिंब्याचा विचार करणार
राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेसचा कोणताही उमेदवार असेल, त्यास पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT