Mumbai news Thane news mob lynched thief
Mumbai news Thane news mob lynched thief  
महाराष्ट्र

चोरीसाठी घरात घुसला; जीव गमावून बसला...

सकाळवृत्तसेवा

कळवा : कळवा पूर्व पारसिक डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पौंड पाडा परिसरात घरात घुसून चोरी करायला आलेल्या तरुणावर जमावाने हल्ला केला. या जमावातील चौघांनी केलेल्या बेदम मारहाणीत चोराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि 20) मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. या प्रकरणी कळवा पोलिसांनी चौघांना अटक केली.

सोमवारी रात्री कळवा पूर्व पौंड पाडा येथील जयभवानी चाळीत राहणाऱ्या जगतप्रसाद यादव यांच्या घरात शत्रुघ्न परम यादव (20) हा चोरी करण्याच्या उद्देशाने घुसला. त्याच्या आवाजाने घरातील झोपलेली माणसे जागी झाली. त्या वेळी शत्रुघ्न पळून जाण्याचा प्रयत्नात खाली पडला. चोर चोर या आवाजाने इतरही लोक जागे झाले. राजेंद्र जगप्रसाद यादव (25), जगत प्रसाद सुरत यादव (52), पंचलाल कुमार यादव (26) आणि दयालाल यादव (39) यांच्यासह इतरांनी शत्रुघ्नला मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

या हत्येप्रकरणी कळवा पोलिसांनी वरील चार संशयित आरोपींना मंगळवारी सकाळी अटक केल्याची माहिती कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद बागडे यांनी दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT