Eknath Khadse
Eknath Khadse Team eSakal
महाराष्ट्र

भोसरी घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंना दिलासा, अंतरिम जामीन मंजूर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (eknath khadase) यांच्यावर पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याचे (bhosari land scam) आरोप आहेत. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाकडून त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टानं त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना देखील काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला होता. याप्रकरणी तूर्तास अटक न करण्याचे ईडीला निर्देश देण्यात आले आहेत. तसेच तपास यंत्रणेला या तपासात सहकार्य करण्याचे निर्देशही खडसेंनी देण्यात आले होते. आता एकनाथ खडसे यांना देखील न्यायालयाने दिलासा दिला आहे. याबाबत ''TV9 मराठी''ने वृत्त दिले आहे.

काय आहे प्रकरण?

एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ३१ कोटी रुपये किंमत असलेली जमीन फक्त ३.७ कोटी रुपयांना विकल्याचा दावा आरोपांत करण्यात आला आहे. त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी भोसरी येथील एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. 52/2 अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत, असेही आरोप त्यांच्यावर आहेत. या व्यवहाराखाली गिरीश यांनी पाच शेल कंपन्यांकडनं आलेला पैसा वापरल्याचं कागदोपत्री निष्पन्न झालेलं आहे. या सर्व व्यवहारात राज्य सरकारचं सुमारे 61 कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. म्हणून गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावून त्यांना अटक केली होती. एकनाथ खडसे यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT