महाराष्ट्र

किल्लारी भूकंप : माझे आयुष्य इथेच दोन चाकांच्या खुर्चीवर थांबले

सुशांत सांगवे

लातूर : त्या दिवशी भूकंप झाला नसता, माझ्या शरीरावर मातीचा ढिगारा पडला नसता, मी कायमची अपंग झाली नसते तर... असे अनेक प्रश्न आजही मनात तयार होतात आणि ती काळरात्र आठवत राहते. अंगावर शहारे उमटवत राहते. माझ्या बरोबरीच्या मुली डॉक्टर, शिक्षिका झाल्याचे पाहून माझे आयुष्य इथेच या दोन चाकांच्या खुर्चीवर थांबल्याचे जाणवत राहते... अशी व्यथा जयश्री निंबुर्गे व्यक्त करत होत्या. माझी ही अवस्था पाहून सरकारने झेरॉक्स मशीन दिले. पण हक्काचे घर नाही, दुकान नाही. व्यवसाय करणार कुठं? असा सवालही त्या उपस्थित करत होत्या.

देशाच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी दिवस म्हणून 30 सप्टेंबर 1993 कडे पहिले जाते. किल्लारीतील शेकडो कुटुंब भूकंपाने गिळून टाकली. त्यात निंबुर्गे कुटुंबाचाही समावेश होता. भाऊ, वहिनी, त्यांची दोन्ही मुलं ढिगाऱ्याखाली सापडली आणि त्यांचा त्यातच मृत्यू झाला. मीही त्याच ढिगाऱ्याखाली होते. माझ्या पाठीवर दगड-मातीचा आणि लाकडाचा जोरात मार बसला होता. भूकंपानंतर दोन तासांनी मला बाहेर काढलं गेलं. तेव्हा मी जीवंत असल्याचं पाहून अनेकांना आनंद झाला. मला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं गेलं. पण तिथं कळलं की आता मी पूर्वीसारखी चालू, पळू शकत नाही. हे वाक्य ऐकताच माझ्यासमोर अंधार पसरला, असं सांगताना जयश्री यांचे डोळे पाणावले होते.

त्या म्हणाल्या, भूकंप झाला तेंव्हा मी दहावीला होते. वर्गात हुशार होते. वाटलं होतं, आपणही शिक्षिका व्हावं. मुलांना शिकवावं. पण ही सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी भूकंपानंतर माझ्या आयुष्यात पहाट उगवलीच नाही. कमरेपासून खालचा भाग निकामी झाल्यामुळं मी खुर्चीवर बसून आहे. माझा दुसरा भाऊ, वहिनी यांच्या मदतीमुळे माझी दैनंदिन कामे होतात. भूकंपानंतर दहावी, अकरावी, बारावीची परिक्षा दिली. पण मला अजून खूप शिकायचं होत. आर्थिक परिस्थिती आणि भूकंपामुळे आलेले अपंगत्व यामुळे शिकण्याला मर्यादा आल्या.

भूकंपग्रस्तांना घरे मिळाली; पण मला घर मिळाले नाही. झेरॉक्स मशीनच मिळाल्याने घराऐवजी दुकान द्या, असे आम्ही सांगितले. पण अद्याप दुकान काही मिळाले नाही, असेही त्या सांगत होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT