वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय टीम ई सकाळ
महाराष्ट्र

'ओरिओ, ऑस्कर, विरा', पेंग्विनची पिलं आणि वाघाच्या बछड्यांचं बारसं

सकाळ डिजिटल टीम

मुंबईत राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पिलांचे आणि वाघांच्या बछड्यांचे नामकरण करण्यात आले. पेंग्विनच्या पिलांची नावे 'ओरीओ' आणि 'ऑस्कर' तर वाघाच्या बछड्याचं 'वीरा' असे नाव ठेवण्यात आले.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या भायखळा येथील हम्बोल्ट पेंग्वीन कक्षातील डोनाल्ड (नर) व डेझी (मादी) यांनी दि. १ मे २०२१ रोजी नर पिल्लाला जन्म दिला होता. पिल्लाचे नाव 'ओरिओ' असे ठेवण्यात आले आहे तर मोल्ट (नर) व फ़्लिपर (मादी) यांच्या जोडीने दि. १८ ऑगस्ट २०२१ रोजी जन्म दिलेल्या पेंग्वीन नर पिल्लाच 'ऑस्कर' असे नामकरण करण्यात आले आहे. याशिवाय बंगाल वाघाची जोडी शक्ती (नर) व करिष्मा (मादी) यांनी दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ रोजी जन्म दिलेल्या मादी पिल्लाचे नाव वीरा' असे ठेवण्यात आले आहे.

बंगाल वाघाची जोडी शक्ती (नर) व करिष्मा (मादी) सुमारे १५ वर्षानंतर १२ फेब्रुवारी २०२० रोजी सिद्धार्थ गार्डन प्राणिसंग्रहालय, औरंगाबाद येथून मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयामध्ये आणण्यात आली होती. आता या बंगाल वाघाच्या जोडीने एका मादी पिल्लाला जन्म दिलाय.

वाघीण करिष्मा व पिल्लू वीरा सुखरूप असून पिल्लू आता दोन महिन्याचे झाले आहे. वाघीण करिष्मा तिच्या पिल्लाची व्यवस्थित काळजी घेत असून पिल्लाची उत्तम वाढ होत असल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली. वीरा सहा महिन्यांची होईपर्यंत तिला पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून तिला जंताची औषधे व लसीकरण करण्यात येणार आहे. सोबत तिला कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पेंग्विनवरून शिवसेनेला आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका केली जाते. यावर लोकांनी आम्हाला हिणवलं पण आम्ही केक कापून हे बारसं साजरं करतोय, असे प्रतिउत्तर सुध्दा महापौर पेडणेकर यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT